श्रीरामपूर:-राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ अक्कलकोटच्या मैदानावर श्रीरामपूरचा झंकार
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ अक्कलकोटच्या मैदानावर श्रीरामपूरचा झंकार ……

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) अक्कलकोट मध्ये सुरु झालेल्या चार खेळांच्या राज्यस्तरीय भव्य स्पर्धेत या वर्षी श्रीरामपुरच्या टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चमक दाखवत प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे .युथ मुली व मुलांच्या गटात अहिल्यानगर जिल्हा संघात श्रीरामपुरच्या खेळाडूंनी दमदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले . संघातील दमदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले . संघातील एकजुट . तांत्रिक तयारी आणि खेळातील अचुकता यामुळे श्रीरामपुरचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवत होते युथ गर्ल्स गटात कार्तिकी महेश गायके .गायत्री वाल्मिक गायके . शर्वरी मच्छिंद्र बोर्डे . श्रावणी कुंदन कहर .आर्या शत्रुघ्न कलसाईत . सर्वज्ञ राजेश डोळसे आणि श्रुती अशोक कार्ले या सातही खेळाडूंनी सुरुवातीपासून वेग . अचुकता आणि नेटवरील नियंत्रण यांचा सुरेश मिलाफ साधत अल्लेखनींय प्रदर्शन केले . संघाची शिस्तबद्ध खेळशैली आणि वेळोवेळी केलेले प्रभावी कमबॅक यामुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली . या मुलीच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नितीन बलराज यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उत्कृष्ट समन्वय आणि जिद्दीचा खेळ दाखवला दुसरीकडे ‘ युथ बॉईज गटात ओंकार झिंज . अनिकेत पाटील . कार्तिकी महांकाळे . अमरजीत यादव . आर्यन शिंदे . देवेश म्हैस . आणि ओम मोरगे या खेळाडूंच्या कामगिरीत चपळ हालचाली दमदार सर्व्हिस आणि बचावातील ताकद यांचे सुरेख मिश्रण पाहायला मिळाले प्रत्येक सेटमध्ये कोर्टवरील त्यांची रणनीती संवाद आणि उत्साहाने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना सतत तणावाखाली ठेवले .
या संघाचे प्रशिक्षण धनंजय माळी यांनी खेळाडूंच्या फिटनेस तांत्रिक तयारी आणि मानसिक मंजबूतपणावर विशेष काम केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते
संघ व्यवस्थापक म्हणून आदित्य पटारे व अर्जुन अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली अक्कलकोट मैदानावर दोन्ही संघांनी उदयोन्मुख टेनिस व्हॉलीबॉयचे हव असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे . राज्यभरातून आलेल्या खेळांडूमध्ये श्रीरामपुरच्या युथ संघांनी दाखवलेला आत्मविश्वास ‘ सराईत खेळ आणि क्रीडाभाव पाहुन या स्पर्धेत त्यांची वाटचाल अधिक रोमांचक होणार याबाबत यात शंका नाही.




