श्रीरामपूर:-अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय – मंत्री बावनकुळे आणि ना. विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय – मंत्री बावनकुळे आणि ना. विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न.

श्रीरामपूर दि.११ प्रतिनिधी
अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय भूमिका घेण्याची भूमिका महायुती सरकार असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापुर्वी केलेल्या पाठपुराव्यावर लवकर शिक्कमोर्तब करण्याची भूमिका महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकारि पडित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सर्व प्रश्न समाजावून घेत सकारात्मक चर्चा केली.
अकारि पडित प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने काही निर्णय झाले आहेत.अन्य काही निर्णय होण्याच्या दृष्टीने महायुती सरकार निश्चित निर्णय करेल आशी ग्वाही देवून, गोरगरिब अकारि पडित शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविणे ही आपली ठाम भुमिका आहे मंत्रिमंडळ बैठकीत यापुर्वी निर्णय घेतलेला आहे. अधिवेशन संपल्याऩतर मुंबईत राजभवनात राज्यपाल महोदयांची भेट घेवून सर्व निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी शेवटी सांगितले.
या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर अॅड अजित काळे यांच्यासह ९ गावातील २५ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते , चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने भाजपाचे दिपक पटारे, गावातील सचिन वेताळ , गोविंद वाघ, ,सुनिल आसने, संतोष मुठे चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापुसाहेब गोरे,बबनराव नाईक,प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे,सोमनाथ रूपटक्के,दादासाहेब रूपटक्के, राजेंद्र गोसावी,अक्षय मुठे,सुभाष गाडेकर,अमोल गुळवे,गंगाधर वेताळ,दत्तात्रय भालेरांव आदी उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले. तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले.




