कणकवली:-तरंदळे धरणात प्रेमी युगुलांची आत्महत्या – आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात; आत्महत्येच्या प्रकरणाने उडाली खळबळ.
पत्रकार अनिल शिंगाडे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

तरंदळे धरणात प्रेमी युगुलांची आत्महत्या – आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात; आत्महत्येच्या प्रकरणाने उडाली खळबळ.

कणकवली : तरंदळे येथील धरणात प्रेमी युगुलांनी उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या उघडकीस आली. सोहम कृष्णा चिंदरकर (२२, कलमठ-कुंभारवाडी) व ईश्वरी दीपक राणे (१८ बांधकरवाडी, कणकवली) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी १० डिसेंबर रोजी सकाळी युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांनी एकमेकांना पकडून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मात्र, दोघांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
याबाबत अधिक वृत्त असे की, सोहम चिंदरकर हा एका महाविद्यालयात बीकॉमचे शिक्षण घेत होता. सोहम दररोज सकाळी कॉलेजला जावून दुपारी घरी यायचा. मंगळवारी सकाळी सोहम हा नेहमीप्रमाणे कॉलेजकरून पुन्हा घरी आला. त्यानंतर सायंकाळी त्याने आईला मोबाईल हरविल्याचे सांगितले. आईच्या मोबाईलमध्ये सिस्टा नावाने सेव्ह केलेल्या मोबाईल नंबरवरून मैत्रीण ईश्वरी हिला तरंदळे डॅमवर येण्याचा व्हॉट्सअॅप मॅजेस पाठवला. त्यानंतर सोहम याने आपल्या काकाची दुचाकी घेत हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सोहम घरी न आल्याने तिच्या आईने ही बाब सोहमच्या काका मिलिंद चिंदरकर यांना सांगितली. त्यानंतर सोहमचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

व्हॉट्सअॅप मेजेसमुळे लागला सुगावा
सोहमच्या आईचा मोबाईलवर सिस्टा नावाने सेव्ह असलेल्या मोबाईल क्रमांकावर सोहमने व्हॉटस्अॅपवर तु तरंदळे डॅमवर ये, असा मेजेस केल्याचे रात्री ११ वा. कुटुंबीयांनी मोबाईल तपासला असता दिसून आले. त्यानंतर चिंदरकर कुटुंबीयांनी ईश्वरी कुटुंबीयाशी संपर्क केला असता ईश्वरीही घरी नसल्याचे समजले. सोहम याच्या नातेवाईकांनी तरंदळे धरण गाठत शोध मोहीम राबवली. सोहमचा बॅटरीच्या आधारे शोध घेतला असता बुधवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास तरंदळे धरणात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. याबाबतची माहिती तात्काळ कणकवली पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, पोलीस हवालदार संतोष तांबे, विनोद चव्हाण, श्रीमती नांदोसकर हे घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातील रात्र असल्याने धरणातून मृतदेह काढण्यास अडचणी आल्या.
मृतदेह बाहेर काढले
त्यानंतर सकाळी पाणबुडयांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. ते मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईकांना मृतदेह दाखवून ओळख पटल्यानंतर वैद्यकीय अधिकाºयांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. सोहम याच्या हातावर ईश्वरीचे नाव कोरलेले होते. घटनेची वृत्त मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी, मित्रपरिवाराने उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.
या घटनेची खबर मिलिंद राजराम चिंदरकर (५०, रा. कलमठ-कुंभरवाडी) यांनी दिली आहे. त्यानुसार घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दोघांनी प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल उचलेले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. कणकवली पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, मृत सोहम हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत घेता होता, तर युवतीही एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सोहम याच्या पश्चात आई, काका, काकी, पुतण्या असा परिवार आहे. चिरे, वाळू व्यावसायिक मिलिंद चिंदरकर यांचा पुतण्या तर श्रेयश चिंदरकर यांचा भाऊ होत. ईश्वरी हिच्या पश्चात आई, वडील,आजी, दोन बहिणी असा परिवार आहे. दोघांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.




