मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – सामाजिक अर्थ जनजागृती : योजनेतील लाभार्थी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – सामाजिक अर्थ जनजागृती : योजनेतील लाभार्थी.

गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळण्यात होणारा विलंब, वाढलेल्या अपेक्षा आणि विवाहसंस्थेबाबत निर्माण होणारे गैरसमज यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला. विवाहसंस्थेचे महत्त्व, पूर्वीच्या नात्यांचा टिकाऊपणा, परस्पर समजूतदारपणा आणि कुटुंबमूल्यांचे स्थान यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. वाढत्या अवास्तव अपेक्षा आणि चुकीच्या समजुतींमुळे समाजात नातेसंबंधांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींचाही आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विविध शासनाच्या कल्याणकारी योजनांमधील पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यात श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि सामाजिक अर्थसाहाय्य योजना यांचा समावेश होता. अभियानाचा भाग म्हणून गावातील सामाजिक उपक्रमांतील त्रुटी, स्थानिक समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांवरही मुद्देसूद चर्चा घेण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ. रूपाली परिट मॅडम उपस्थित होत्या. तसेच गावातील मान्यवर, विभागप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या उपक्रमाचे आयोजन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सर्व विभागप्रमुख, गावातील मान्यवर आणि उत्साही युवकवर्ग यांच्या प्रेरणेतून करण्यात आले.
एकत्रित प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून ग्रामस्थांनी सामाजिक समजूतदारपणा, समानता आणि प्रगतीच्या दिशेने एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.




