कणकवली:-जबर चोरीतील तिघांना पोलीस कोठडी – एलसीबीची कारवाई कार ही जप्त, आणखीण ५ जण पोलिसांचा रडारवर.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जबर चोरीतील तिघांना पोलीस कोठडी – एलसीबीची कारवाई कार ही जप्त, आणखीण ५ जण पोलिसांचा रडारवर.

कणकवली : फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीला एलसीबीच्या पथकाने भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. टोळीतील तीन आरोपींना अटक करून एलसीबीचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. जगदीश श्रीराम यादव (२५,भिवंडी), चनाप्पा साईबाणा कांबळे (५०, ठाणे), नागेश हनुमत माने (४१, नेरूळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोरी प्रकरणात वापरण्यात आलेली कार ताब्यात घेतली. या प्रकरणात ४ ते ५ जणांचा सहभाग असून हे संशयित पोलिसांचा रडारवर आहेत.
ही घटना फोंडा गाडी येथे ३० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. त्याचवेळी तीन इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. याबाबत कणकवली व एलसीबी पोलीस दोघांचाही समांतर तपास सुरू होता. संशयितांचा ठावठिकाणा लागल्यानंतर एलसीबीची टीमचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाली. एलसीबीच्या पथकाने तिन्ही संशयितांना शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. चोरीप्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेली कार ही संशयित आरोपी जगदीश यादव याचा नावावर आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक सुरेश राठोड, आशिष गंगावणे, हवालदार श्री. कांडर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत.
फोटो
……………
ओसरगावात ५० हजार रुपयांची दारू जप्त
कणकवली : अवैध धंदे विरोधी पथकाने ओसरगाव येथे छाप्पा टाकून ५० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवार ७.३० वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी नागेश आनंद चव्हाण (४५, रा. ओसरगाव-पटेलवाडी) याच्यावर दारू बागळल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
अवैध धंदे विरोधी पथकाला ओसरगाव एक व्यक्तीने दारू बागळ्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी त्याच्या घरावर छाप्पा टाकला असता घराच्या परिसरात एका पिशवीत गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक आर. पी. शेळके, दर्शना पालकर, देवानंद माने यांनी केली. याप्रकरणी देवानंद माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.




