सातारा:-सेवानिवृत्तीनंतर निसर्गाच्या सानिध्यात कौटुंबिक आनंद साजरा करा- माननीय न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय,सातारा, सौ.एम.आर.काळे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सेवानिवृत्तीनंतर निसर्गाच्या सानिध्यात कौटुंबिक आनंद साजरा करा- माननीय न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय,सातारा, सौ.एम.आर.काळे.

सातारा दि: शासकीय अथवा खाजगी सेवेतील सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत असते. त्यामुळे आता सेवानिवृत्तीनंतर निसर्गाच्या सानिध्यात कौटुंबिक आनंद साजरा करा असे प्रतिपादन सातारा कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय सौ. एम. आर. काळे यांनी सातारा येथे केले.
कौटुंबिक न्यायालयातील वर्ग दोन स्टेनोग्राफर श्रीमती कल्पना जगताप यांच्या सेवानिवृत्ती निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कौटुंबिक न्यायालय समुपदेशक मा. दाते, प्रबंधक मा. वनारसे, श्रीमती सीमा जगदाळे, श्रीमती वंदना जाधव, श्री. संतोष जाधव ,सुरज जाधव , युवराज मस्के, राहुल नावडकर , चेतन कुलकर्णी, रवी कोरडे, श्रीमती शितल सोनटक्के व कर्मचारी उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे कोणत्याही कामांमध्ये आपण आपले योगदान देतो. त्या कार्यालयात एक कौटुंबिक नाते निर्माण होते. आता सेवानिवृत्तीनंतर भरपूर वेळ मिळाल्यामुळे तणावमुक्त वातावरणात वाचन- फिरणे व छंद जोपासले पाहिजे. प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. पुणे सारख्या मोठ्या शहरातून साताऱ्यात न्यायदानाचे काम करत असताना सर्वांचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. सर्वांच्या सोबत न्यायदानाचे पवित्र संस्थेत चांगले काम झाले आहे. ते कधीही विसरता येणार नाही. आठवणीचा ठेवा मनाच्या कप्प्यात कायम राहणार आहे. असे सांगून न्यायाधीश सन्माननीय सौ. काळे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ व श्री. अजित जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. भावनिक वातावरणामध्ये आपल्या आई बद्दल माहिती देताना कुमारी अंकिता जगताप यांच्या आनंदाश्रूमुळे संपूर्ण कौटुंबिक न्यायालयात भावनिक झाले होते. सत्कारला उत्तर देताना श्रीमती कल्पना जगताप यांनी सांगितले, न्यायदानाच्या पवित्र संस्थेत मला काम करण्यास मिळाले याचा मला अभिमान आहे. न्यायदानात कार्यरत होण्यासाठी जे पहिले पाऊल टाकले. तसेच सेवानिवृत्तीनंतरचे शेवटचे पाऊल हे सदैव स्मरणात राहणारे आहे. अनेकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच दोन्ही पावले टाकण्यास यश मिळाले. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी कायमची ऋणी राहणार आहे. एक सहकारी व मार्गदर्शक म्हणून मी नेहमीच न्यायालयाच्या बद्दल आदर युक्त भावना जतन करून जात आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे खूप काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या. न्यायव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्वच सहकार्यांचाही उत्साह कायम प्रेरणादायक आहे. न्यायदानाचा हा अखंड झरा कायम समाजाची अपेक्षा पूर्ण करणार आहे असे स्पष्ट केले.
दरम्यान, सातारा जिल्हा न्यायालयाच्या वतीने सेवानिवृत्त होणाऱ्या सातारा न्यायालय प्रबंधक श्रीमती वर्ष जोशी, पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर व श्रीमती कल्पना जगताप, लघुलेखक श्रेणी 1 , वर्ग 2 अधिकारी, एकूणतीस वर्ष पाच महिन्याच्या सेवेनंतर , यांचाही निरोप समारंभ घेण्यात आला.
या कार्यक्रमाला सातारा न्यायालयातील अधीक्षक श्रीमती संगीता गुरव , श्री. आर . एस. कुलकर्णी, श्रीमती बारसावडे, श्रीमती सुरेखा बोतालजी, तसेच श्री. उद्धव वाकडे, शिंदे, केंजळे, श्रीमती संतोषी सावंत, गोपाळ राजे , श्रीमती मनीषा नामदास, स्मिता अडसूळ, रेहाना बागवान, मनिषा फडतरे, नम्रता शिंदे, देशपांडे मॅडम, स्टेनोग्राफर श्रीमती बागल,नडे, मीना गायकवाड, स्टेनोग्राफर धेरडी, शिळमकर, प्रशांत जोशी व गुलदगड, कोळी , आयताळ यांच्यासह न्यायालय कर्मचारी तसेच छाया वहागावकर, वर्षा अमोल जगताप,वंदना वहागावकर आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्ती निमित्त कौटुंबिक व सातारा न्यायालयाच्या वतीने सेवानिवृत्ती सत्कारमूर्तींना शाल , पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळेला श्रीमती अफसाना मुजावर व चंद्रकांत कांबिरे यांनी मोजक्या शब्दात परंतु खूप मोठा आशय असलेल्या मराठी भाषेमध्ये सूत्रसंचालन केले. यावेळेला न्यायालयीन प्रबंधक मा. दीपक देसाई, महादेव कुंभार, ए.के. माने कर्मचारी प्रज्वल मोरे, श्रीमती ताटे, मार्गदर्शक आलम काजी, कोमल लवंगारे व सर्व न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच वकील मंडळींनी शुभेच्छा दिल्या.




