कळमगाव:-(महाबळेश्वर)-“संस्मरणांतून उजळली वेणाबाईंची कर्तृत्वगाथा” कळमगावात ह.ब.प.श्रुतिका पालांडे यांचे हृदयस्पर्शी कीर्तन.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“संस्मरणांतून उजळली वेणाबाईंची कर्तृत्वगाथा” कळमगावात ह.ब.प. श्रुतिका पालांडे यांचे हृदयस्पर्शी कीर्तन.

कळमगाव (ता. महाबळेश्वर) : पत्रकार -उत्तम भालेराव
गावातील मोरे कुटुंबातील ज्येष्ठ माता कैलासवासी वेणाबाई दिनकरराव मोरे यांच्या उत्तरकार्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात संपूर्ण गावभाविक वातावरण निर्माण झाले. वेणाबाई मोरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात ह.ब.प. कुमारी श्रुतिका पालांडे (अचलोली, ता. महाड) यांनी उपस्थित भाविकांसमोर अत्यंत हृदयस्पर्शी, संस्कारमूल्यांनी परिपूर्ण असे कीर्तन सादर केले.
कार्यक्रमाला कळमगाव तसेच परिसरातील अनेक भाविकांनी उपस्थिती लावली. ह.ब.प. श्रुतिका पालांडे यांनी दिवंगत वेणाबाईंच्या साध्या, संयमी आणि संस्कारी जीवनाचा उल्लेख करत त्यांच्या कष्टमय प्रवासाचे अत्यंत भावनिक चित्र उपस्थितांसमोर उभे केले. वेणाबाईंच्या घर-परिवार उभारणीतल्या योगदानाचा उजाळा देताना भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. मोरे कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला.
कीर्तनातून पालांडे यांनी माता-पित्यांविषयी कृतज्ञता, संस्कारांचे महत्व आणि समाजातील स्त्रीशक्तीची अनमोल भूमिका यावर प्रभावी भाष्य केले. कार्यक्रमाची सांगता वेणाबाई मोरे यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी करण्यात आलेल्या सामूहिक प्रार्थनेने झाली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मोरे परिवारासोबत गावातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व भाविकांनी दिवंगत वेणाबाई मोरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.




