पारनेर:-सुपा पंचक्रोशी म्हणजे,बिबट्यांचे माहेरघरच!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सुपा पंचक्रोशी म्हणजे,बिबट्यांचे माहेरघरच!

पारनेर ; राजकुमार इकडे
दि ३० सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील सुपा पंचक्रोशीतील पिंपरी गवळी येथील वडाचा दरा येथे दि,१५ नोहेंबर रोजी एक बिबट्या वनविगाच्या पिंजर्यामुळे धरला,आणी दि ३० नोहेंबर ला परत एक बिबट्या जेरबंद करण्यात आला.तेथे ही वनविभागाला यश आले,तरी ह्या परीसरात लहान,लहान बिबट्यांचा वावर आज ही दिवसा,रात्री पहावयास मिळतो,
पाच दिवसापुर्वी पिंपरी गवळी येथील शेतकरी रामदास थोरात यांच्या वर बिबट्याने हाल्ला केला होता ते बालबाल बचावले .त्याच रात्री परीसरातील शेतकरी भाणुदास भोरात यांच्या गायीवर बिबट्याने हाल्ला केला होता, दुसरे दिवशी अविनाष बांदल याच्या शेळ्यावरती बिबट्याने हाल्ला केला,रात्रीच्या वेळी बाळासाहेब मांडगे यांच्या गायी गोठ्यावर बिबट्याने हाल्ला केला होता.असे अनेक प्रकार सुपा पंचक्रोशीतील गावावर होत आहे,
सुपा पंचक्रोशी म्हणजे बिबट्यांचा हाट स्पाॅट झाला आहे,असे अनेक लहान मोठे बिबटे परीसरात दररोज नजरेस पडतात.परीसरात काही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन बिबट्यांचा बंदोबस्त होने गरजेचे आहे असे पिपंरी गवळी येथील प्रगतशिल शेतकरी राजुशेट थोरात.भाउसाहेब थोरात,प्रदीप थोरात,धनंजय गवळी.अरुण थोरात,विश्वनाथ मांडगे,अनिल थोरात,विरेंद्र थोरात,विरेंद्र गवळी,विकास थोरात,केशव थोरात,संदीप थोरात,सुनिल थोरात,पंडीत थोरात,नवनाथ रणशिंग,दत्ताथोरात यांनी सांगितले.




