पारनेर:-राज्यव्यापी ‘शिव पाणंद’ शेतरस्ता जनजागृती अभियानाचा मंत्रालयातून शुभारंभ.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राज्यव्यापी ‘शिव पाणंद’ शेतरस्ता जनजागृती अभियानाचा मंत्रालयातून शुभारंभ.
शासननिर्णयांच्या अंमलबजावणीसाठी शिवपाणंदचा पाठपुरावा

पारनेर- राजकुमार इकडे
तमाम महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकरी भावापर्यंत दर्जेदार शेतरस्ता पोहोचवण्यासाठी आणि शेतरस्त्यांशी संबंधित कायमस्वरूपी अडचणी दूर करण्यासाठी ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.
“शेत तिथे रस्ता – गाव तिथे समृद्धी” हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चळवळीने एकात्मता आणि सामूहिक नेतृत्वाचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला आहे.
गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५, रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे समन्वय बैठक घेतली. पुढील आंदोलनाची दिशा, जनजागृती आणि संवाद यावर महत्त्वपूर्ण निर्णय ठरवण्यात आले.
राज्यभर प्रशासन, शासन आणि न्यायालयीन पातळीवर सातत्यपूर्ण संघर्ष करून, अनेक तालुके–जिल्ह्यांत संघटन बळकट केली आणि सरकारचे लक्ष वेधले. या प्रयत्नांना प्रतिसाद देत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय जाहीर केले. चळवळीच्या वतीने सरकारचा सन्मान व आभारही व्यक्त करण्यात आले.
जिल्हा–तालुका प्रशासनाकडून निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पदाधिकारी मंत्रालयात भेटी देत, संबंधित विभागांना निवेदने सादर करून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत.
मंत्रालयातून “शेत तिथे रस्ता – गाव तिथे समृद्धी” या राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर हे अभियान भव्य व प्रभावीपणे राबवून शासननिर्णयांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पक्का निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड.सागर जोरी,ॲड. प्रणाली समीर येवले,शांताराम पानमंद, जेष्ठ पत्रकार शिवाजी राऊत,सचिन शेळके,रामहरी बोंबे, दत्तात्रय बांगर,सुरेश भुजबळ,संजय साबळे,बबन गुंड,भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज,संजय जाधव,संजना जाधव,स्वप्नील कोहकडे आदी राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संखयेने उपस्थित होते.




