मायणी:-श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने श्री दत्त जयंती नाम -जप – यज्ञ सप्ताहाचे मायणी येथे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने श्री दत्त जयंती नाम -जप – यज्ञ सप्ताहाचे मायणी येथे आयोजन.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित अष्टसिद्ध शक्तिपीठ, गुरुपीठ ,त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक अंतर्गत येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शाखा मायणी ता. खटाव यांच्या वतीने गुरुवार दि. २७ नोव्हेंबर ते शुक्रवार दि. ५ डिसेंबर अखेर श्री दत्त जयंती नाम -जप -यज्ञ सप्ताहाचेआयोजन करण्यात आले असून या निमित्ताने या सप्ताहात पुढील प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. २७ ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी .शुक्रवार दि. २८ मंडल स्थापना, अग्नी स्थापना ,स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचन.शनिवार दि. २९ नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोध याग.रविवार दि. ३० नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग. सोमवार दि. १ नित्य स्वाहाकार श्री गीताई याग.मंगळवार दि. २ नित्य स्वाहाकार ,चंडी याग.बुधवार दि. ३ नित्य स्वाहाकार श्री रुद्र याग /मल्हारी याग. गुरुवार दि. ४ नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहु,ती दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव .शुक्रवार दि. ५ श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम सप्ताह सांगता.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी ८ भूपाळी आरती, सकाळी ८.१५ पंधरा नित्य स्वाहाकार ,सकाळी ८.३० ते १० गुरुचरित्र वाचन ,सकाळी १०.३० महानैवेद्य आरती, सकाळी १०. ४५ विशेष याग ,दुपारी २ ते ५ श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पाठ वाचन ,सायंकाळी ५.३० औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी ६ महानैवैद्य आरती, सायंकाळी ६.३० विविध विषयांवर मार्गदर्शन ,सायंकाळी ७ नित्यसेवा व नित्य ध्यान.
तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.




