कणकवली:-इतर कोणालाही पाठिंबा नाही – खासदार नारायण राणेंनी स्पष्ट केली भूमिका.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

इतर कोणालाही पाठिंबा नाही – खासदार नारायण राणेंनी स्पष्ट केली भूमिका.

शहर विकास आघाडीच्या सभांमधून नारायण राणेंचा पाठिंबा असल्याचे करण्यात आले होते वक्तव्य
कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर,आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे यांच्यासह,नगरसेवक पदाचे उमेदवार, राकेश बळीराम राणे, प्रतीक्षा प्रशांत सावंत, स्वप्निल शशिकांत राणे, माधवी महेंद्रकुमार मुरकर, मेघा अजय गांगण, स्नेहा महेंद्र अंधारी, सुप्रिया समीर नलावडे, गौतम शरद खुडकर, मेघा महेश सावंत, आर्या औदुंबर राणे, मयुरी महेंद्र चव्हाण, मनस्वी मिथुन ठाणेकर, गणेश उर्फ बंडू हर्णे, सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, विश्वजीत विजयराव रासम, संजय कामतेकर आबीद नाईक उपस्थित होते.




