कणकवली:-‘साधू कणकवलीत दाखल झाल्यामुळे तर्क वितर्कना ऊत – काही उमेदवारांची देखील साधूनी घेतली भेट.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

‘साधू कणकवलीत दाखल झाल्यामुळे तर्क वितर्कना ऊत – काही उमेदवारांची देखील साधूनी घेतली भेट.

कणकवली नगरपंचायतीची निवडणूक राज्यात बहुचर्चित झालेली असताना एकीकडे कणकवलीमध्ये विविध राजकीय घडामोडी देखील घडत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर कणकवलीत दाखल झालेल्या साधूंच्या इंट्री ची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. अंगाला भस्म लावलेले व जटाधारी साधू कणकवली त आल्याने चर्चांना ऊत आला आहे. हे तीन साधू दाखल झाले असून उत्तर प्रदेश पासिंगच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. यातील काही साधूनी कणकवलीतील दोन्ही बाजूच्या काही उमेदवारांची भेट देखील घेतल्याची चर्चा आहे. कणकवली मध्ये सध्या भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू असल्यामुळे या पुण्यतिथी महोत्सवाला हे साधू आल्याची चर्चा असली तरी या साधूंनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची देखील भेट घेतल्याने राजकीय पक्षांकडून हे साधू आणले गेले आहेत की काय? अशी चर्चा कणकवलीकरांमध्ये सुरू आहे. कणकवली शहरात या साधूंच्या इंट्रीमुळे आता एकमेकांकडून दावे, प्रतिदावे देखील केले जात आहेत. त्यामुळे हे साधू कुणाला लाभदायक ठरणार ?हे देखील पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.




