कराड:-श्री.शिवाजी विद्यालय ,कराड येथे आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा स्मृतिदिन साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्री.शिवाजी विद्यालय ,कराड येथे आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा स्मृतिदिन साजरा.

कराड:- श्री शिवाजी विद्यालय ,कराड येथे आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला या वेळी बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटणचे शारीरिक शिक्षण विषयाचे संचालक मा.प्रा.डॉ.दीपक शंकरराव पाटील- डांगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे उत्तम गुण आपल्या ओघवत्या व प्रभावी भाषाशैलीत सांगून प्रभावित केले . विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात चांगल्या गुणांचे संवर्धन करून नाव मोठे करावे असे या प्रसंगी त्यांनी सांगितले. प्रतिमापूजन व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी .डी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागता नंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .यशराज शिंदे तसेच अमन मोमीन या विद्यार्थ्यांची भाषणे झाली .विद्यालयाचे नूतन शिक्षक श्री लोंढे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार भंडारे या विद्यार्थ्याने उत्तमपणे केले .आभार कार्याध्यक्ष श्री वायदंडे आर .सी .यांनी मानले.




