पारनेर:-सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध्य धंदे व वेश्या व्यवसाय बंद करा – अजित पवार गट राष्ट्रवादी पारनेर तालुका युवती कार्याध्यक्ष सोनाली ताई कुलथे.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध्य धंदे व वेश्या व्यवसाय बंद करा – अजित पवार गट राष्ट्रवादी पारनेर तालुका युवती कार्याध्यक्ष सोनाली ताई कुलथे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)पारनेर तालुका युवती कार्याध्यक्ष सोनालिताई कुलथे यांचे पोलिस निरीक्षक सुपा व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कबाडीया यांना निवेदन.
सुपा ,पारनेर -राजकुमार इकडे
सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध्यरीत्या चालू असलेले सुपा व नवीन M.I.D.C म्हसणे फाटा तसेच नगर पुणे हायवे वरती जातेगाव फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती देह विक्री (वेश्या व्यवसाय )चालतो तसेच हायवे लगत असणारे धाबे ,हॉटेल,व टपरया यांसवरती दारू विक्री,गुटखा विक्री ,गांजा विक्री असे व्यवसाय चालतात तसेच म्हसणे फाटा येथील नवीन M.I.D.C व सुपा येथील जुनी M.I.D.C यामध्येही मोठ्या प्रमाणात टपरयावरती व हॉटेल वरती मोठ्या प्रमाणात दारू, गांजा,व गुटखा विक्री केला जातो व सुपा परिसरात चोरट्या पद्धतीने मटका व इतर अवैध्य व्यवसाय चालू असून आपल्या कार्यालयाकडून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसून आपल्या कार्यालयाचा व आपला धाक नसून हे धंदे मोकाट स्थिती मध्ये दिसून येत आहे तरी आपण लक्ष देऊन त्या अवैध्यरित्या चालविणाऱ्या व्यवसाय धारकांवरती आपणाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व ते धंदे कायम स्वरूपी बंद करण्यात यावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट पारनेर तालुका युवती कार्याध्यक्ष सोनालीताई कुलथे यांनी निवेदनात म्हटले आहे.




