ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाचगणी:-थंड हवेचे ठिकाण पाचगणी.. पण ,,निवडणुकीत जिरवा जिरवी….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

थंड हवेचे ठिकाण पाचगणी.. पण ,,निवडणुकीत जिरवा जिरवी….


पाचगणी दि:
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी महाबळेश्वर होय. या ठिकाणचे राजकारण नेहमीच अनपेक्षित व धक्कादायक मानले जाते. पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे मागासवर्गीयांसाठी राखीव झाले आहे. .त्यामुळे नगराध्यक्षाच्या खुर्चीवर आपलाच विचारांचा माणूस नगराध्यक्ष बसावा. यासाठी थंड हवेच्या ठिकाणी राजकीय शेकोट्या पेटवल्या जात आहेत. त्यात स्थानिकांनी जिरवा जिरवीचा जाळ घातला जात आहे.
आरक्षणामुळे प्रत्येक मागासवर्गीय कार्यकर्त्याला बळ आले आहे. घर का भेदी.. लंका दहन… कसं करणार पाचगणीचे मतदार सहन.. असं म्हणण्याची पाळी आली आहे.
पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम व अभ्यासू उमेदवाराची गाठ सुटली नसल्याने आठ जण इच्छुक आहेत. तर २० नगरसेवकांसाठी राजकीय पक्ष, आघाडी व अपक्ष ७५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही प्रभागांमध्ये विजय उमेदवारापेक्षा मत खाणाऱ्या अपक्षांची चांगलीच चलती निर्माण झालेली आहे. प्रचाराची मुख्य भूमिका ही टीकाटिपणी नसली तरी पाचगणीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी नमूद आहेत. या बाबी पूर्ण करण्यासाठी नेमकं काय व्हिजन आहे.? हे गुलदस्त्यात आहे.
पाचगणी नगरपालिकेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व पाचगणी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीताई कऱ्हाडकर – भाजप- शेखर कासुर्डे,असा सामना असला तरी सत्ताधारी व विरोधकांना पक्ष बदलण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. मतदारांनी मत देताना पाचगणीच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करावे. असे नमूद करण्याची पाळी आली आहे. पाचगणी नगरपालिकेच्या अनुषंगाने अनेक मागतकरी नेहमीप्रमाणे घिरट्या घालून गेले आहेत. त्यात सर्वच उमेदवार हाताला लागले नाहीत.पाचगणी स्थानिक प्रश्नांची जाण असणारे अनेक उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत. ही जमेची बाजू आहे. सक्षम उमेदवार हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे या ठिकाणी आर्थिक निकषावरच विजय संपादन करणे सोपे जाते. ही बाब सुद्धा अनेक मतदारांना खटकत आहे.
पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी दिलीप बगाडे, संतोष कांबळे ,पत्रकार सुनील कांबळे, सुनील बगाडे, दीपक कांबळे असे एकमेकांचे हितसंबंध व नातेवाईक असणारी मंडळी आहेत. त्यात उजवे, डावे असा भेदभाव नाही.
त्याचबरोबर पाचगणी नगरसेवक पदासाठी अनेक जण नशीब आजमावत आहेत.पाचगणी हे पर्यटन स्थळ असले तरी पाचगणी बस स्थानकाची अवस्था तसेच अतिक्रमण व पार्किंगचा बिकट प्रश्न आहे .स्वच्छतेबाबत व्यक्तिगत पातळीवर कोणालाही त्याचे देणे घेणे नाही. पर्यटन स्थळ असूनही अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. वाढीव गावठाण याचा प्रश्न प्रलंबित आहे . लीज प्रॉपर्टी धारकांच्या समस्या कायम तशाच आहेत. भाजी मंडई मध्ये मंडई कुठे आणि टपऱ्या कुठे ?याचा शोध घेतला तर एखाद्या ग्रामपंचायतीला शोभेल असाच कारभार आहे. नगरपालिकेला कर देणे हे नागरिकांचे परम कर्तव्य आहे. सुविधा नाही.
या ठिकाणी खेळाडूंना सुसज्ज क्रीडांगण नाही. नाना नानी पार्क साठी आवश्यक असणारी यंत्रणा नाही. पर्यटक फक्त थंड हवेचे ठिकाण म्हणून येतात. पण ,त्यांना कोणतीही सुविधा नाही. कर मात्र नियमित घेतला जातो. आणि या कराचा वाटा प्रत्येकांना त्यांच्या ताकदीने मिळतो. एकमेका सहाय्य करू अवघे लुटू पाचगणी या कारभाराला आता मतदारांनी धडा शिकवणे गरजेचे आहे .परंतु, राजकीय साटेमारीमुळे त्यासाठी किमान वीस – पंचवीस वर्ष वाट पाहावी लागणार अशी परिस्थिती आहे. फक्त जादूची कांडी फिरवली तरच काहीतरी विकास दिसेल. यासाठी खांदेपालट होणे निश्चित आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button