ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-शाखाप्रमुख पात्रता नसताना रणजितसिंह भोसलेंना जिल्हाप्रमुख पद दिल्याने माझ्यावर निलंबनाची कारवाई– विकास शिंदे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शाखाप्रमुख पात्रता नसताना रणजितसिंह भोसलेंना जिल्हाप्रमुख पद दिल्याने माझ्यावर निलंबनाची कारवाई– विकास शिंदे

सातारा दि: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या सामाजिक कार्यालय प्रेरित होऊन मी तीन वर्षांपूर्वी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात जनसंपर्क वाढतच गेल्याने शिवसेना पक्षातील स्थान बळकट होऊ लागले. त्यामुळे एखाद्या गावचा शाखाप्रमुख सुद्धा होण्याची पात्रता नसलेले श्री रणजीतसिंह भोसले यांना शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख केल्यामुळेच व त्यांनी कूटनीती वापरून शिवसेना वरिष्ठांना दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे निलंबनाची कारवाई झाली. असा खुलासा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री विकास शिंदे यांनी सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत केला.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे कट्टर समर्थक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्कप्रमुख शरद कणसे, आ . महेश शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. ज्यांच्या कोरेगाव तालुक्यातील गावात सर्व पक्षाची कमिटी आहे परंतु, शिवसेना शाखा नाही. युवा सेनेत असल्यापासून त्यांच्या मागे गावातील एकही शिवसैनिक नाही. अशा व्यक्तींना शिवसेना शाखाप्रमुख होण्याची पात्रता नसताना सातारा जिल्हा प्रमुख पद मिळाल्यामुळे त्यांना खूप मोठे झाल्याचे वाटत आहे. फुकटची बॅनरबाजी मुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली. माझ्या बंधूंनी नगरपालिकेतून अर्ज मागे घेतला ही चूक असली तरी मला अर्ज मागे घेण्यासाठी कुणी प्रवृत्त केले. हे जनतेला माहित आहे. असेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे कर्तबगार शिवसेनेचे आमदार आदरणीय कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळेला कोरेगावातील वीस गावात शिवसेनेच्या धनुष्यबाणाला विरोध करणारे श्री भोसले यांच्याकडे नैतिकता नाही. त्यांची बलस्थाने म्हणजे फुकटची बॅनरबाजी , रीळ बनवणे. वरिष्ठांना कर्तव्यदक्ष व निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल कान भरणे. या कार्यात ते माहीर आहेत.
आपण केलेल्या अनेक कामगिरीमुळे मनसेतून फुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्येच राहून मनसेची शाखा सुरू केलेली आहे. त्यामुळे अनेक मनसे सैनिकांचे शिवसेनेत त्यांनी पुनर्वसन केले . शिवसेना निष्ठावंतांवर अन्याय केला आहे. हे सर्व शिवसैनिक आता श्री. भोसले यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत.
क्रांतिकारी वाई तालुक्यातील त्याची सुरुवात झालेली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी माझी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाप्रमुख पद निर्माण करून स्वतःच्या पदाची गिरमा कमी केली आहे. वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या अनेक विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यास यश मिळाले आहे.
वाई तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या पस्तीस शाखा सुरू केल्या आहेत. आजही शिवसेनेचेच काम करत आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई व संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेनेचेच काम करत आहे. माझ्या घराण्याला राजकीय वारसा असून माझ्या वडिलांनी सामाजिक कार्य तसेच आईने विविध पद भूषवलेले आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब हे वाई तालुक्यात किंग मेकर म्हणून ओळखले जातात. तोडपाणी व दोन नंबरच्या अनधिकृत धंद्याचे चक्र फिरवून खंडणी घेण्याची गरज नाही. याची शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी पत्रकारांना सुद्धा आठवण करून दिली.
शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार माझं निलंबन केलेला असून राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांचेही निलंबन झाले होते. त्यांनी पुन्हा सक्रिय होऊन पक्ष मजबूत केला आहे. मी वरिष्ठ शिवसेना नेत्यांशी वस्तुनिष्ठ माहिती देऊन शिवसेनेमध्ये सक्रिय होऊन शिवसेना वाढीचा प्रयत्न करीन. असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
शिवसेना पक्षांमध्ये विकास शिंदे व त्यांच्या शिवसैनिकांच्या वाढत्या प्रवाहामुळे अस्थिरता व भीतीदायक वातावरण श्री . रणजितसिंह भोसले यांची झोपमोड करत होते. त्यामुळे त्यांनी कुरघूडीचे राजकारण केले. शिवसेना पक्षाची बांधणी करण्यासाठी मी इतर पक्षाला आतून व बाहेर मदत करणार नाही. हे काम श्री रणजितसिंह भोसले यांना चांगले जमते असे त्यांनी टोला लगावला. शिवसेना वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या लेटर पॅडचा गैरवापर करून प्रसार माध्यमांना चुकीची माहिती देणाऱ्या श्री भोसले यांची पक्षातून हाकलपट्टी करावी. अशी त्यांनी मागणी केली आहे. शिवसेना वरिष्ठ नेत्यांना सुद्धा त्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, याबाबत संबंधितांशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही. शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे शिवसेनेचे नुकसान होऊ नये. यासाठी शिवसेना नेत्यांनी वस्तुनिष्ठ माहिती द्वारे पुढील वाटचाल करावी. असे सामान्य शिवसैनिकांनी विनंती केली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button