वाई:-पक्षावरील निष्ठेमुळे निलेश मोरेंचा उमेदवारी अर्ज माघार.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पक्षावरील निष्ठेमुळे निलेश मोरेंचा उमेदवारी अर्ज माघार.

पक्षावरील निष्ठेमुळे निलेश मोरेंचा उमेदवारी अर्ज नाही
प्रतिनिधी वाई
वाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निमित्ताने संपूर्ण वाई शहरांमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे याच दरम्यान कित्येक कार्यकर्त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरपरिषद आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर कित्येक कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा पवित्र घेतला होता परंतु वाई शहरांमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये इच्छुक असलेले श्री निलेश मोरे यांनी बंडखोरी न करता पक्षाची निष्ठा व मकरंद पाटील यांचा शब्द प्रमाण मानला समाजामध्ये आदर्श घडवला समाज कार्य करताना केवळ पदच महत्वाचे नाही तर लोकांचा आशीर्वाद आणि नेत्यावरचे प्रेम देखील महत्त्वाचे आहे अंतिम क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्ष निष्ठेमुळे निलेश मोरे यांच्या डोळ्यात अश्रू आले व कोणत्याही परिस्थितीमध्ये नामदार मकरंद पाटील यांना सोडायचे नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अनेक प्रभागामध्ये बंडखोरी झाली श्री निलेश मोरे गेली आठ वर्ष प्रभागांमधून इच्छुक होते समाजकार्याबरोबर निरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आग्रही होते आरोग्य शिबीर रक्तदान शिबिरे नामदार मकरंद पाटील यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अव्याहात पणे कार्य त्यांनी केले परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना संधी डावली गेली. नामदार मकरंद पाटील यांच्यावरील असलेले प्रेम व पक्षावरील निष्ठा यामुळे त्यांनी उमेदवारी केली नाही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजाविषयी असलेली तळमळ व विकास कार्य त्यांच्या विचारांमध्ये स्पष्ट जाणवत होते संधी मिळाली नाही तरी चालेल परंतु निष्ठा मातीला मिळू नये या विचाराने ते प्रेरित झालेले होते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतेही पद डावलने माझ्यासाठी सहज शक्य आहे परंतु नामदार मकरंद पाटील यांचा विश्वास घात करणे माझ्या रक्तात नाही आणि मी ती करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आगामी काळात समाजकार्य अव्याहात पणे करणे व समाजकारण निरंतर करणे हेच त्यांचे ध्येय राहील ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रविवार पेटीचे प्रमुख नेते म्हणून काम करतील यात तिळमात्र शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नामदार मकरंद पाटील यांचा शब्द प्रमाण मानून निरंतर राजकीय वाटचाल राहील असे त्यांनी सांगितले.




