खंडाळा:-खंडाळाचे नूतन तहसीलदार यांचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत..
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खंडाळाचे नूतन तहसीलदार यांचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत..

खंडाळा – खंडाळाचे तहसीलदार अजित पाटील यांची नागपूर येथे उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने बदली झाली असून आता श्री. सुहास थोरात हे खंडाळा तालुक्याचे तहसीलदार असणार आहेत.
महसूल खात्याने नायब तहसीलदार, तहसीलदारांना पदोन्नती देण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या पदोन्नती व बदल्या करण्यात आल्या आहेत.
तरी नूतन तहसीलदार श्री. सुहास थोरात यांची खंडाळा तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. तहसीलदार सुहास थोरात यांनी यापूर्वी उद्योग संचलनालय, उद्योग विभाग मुंबई येथे तहसीलदार म्हणून आपली सेवा बजावली आहे.
तरी तहसीलदार म्हणून खंडाळा तालुक्याच्या प्रशासनाची आणि महसुलाची प्रमुख जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे व त्यांच्या अनुभवाचा फायदा तालुक्याच्या विकासाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे नूतन तहसिलदार सुहास थोरात हे शिस्तप्रिय तहसीलदार म्हणूनही त्यांनी आपल्या नावाचा ठसा कामातून यापूर्वीही दाखविला आहे.
नूतन तहसीलदार श्री. सुहास थोरात यांनी आज सोमवार १७/११/२०२५ रोजी खंडाळा येथील तहसील कार्यालयात येवून आपला पदभार स्वीकारला असल्याने त्यांच्या स्वागतासाठी तहसील कार्यालयातील सेतू कर्मचारी श्री. ओंकार शिर्के , धनंजय रासकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनापासून स्वागत केले तसेच शासकीय कामासाठी सेतू कर्मचारी सज्ज असल्याची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली.




