सिंधुदुर्ग:-कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवली:-कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.

कणकवली:-कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी सायंकाळी उशिरानंतर होणार होत्या. मात्र काही कारणास्तव या मुलाखती बुधवारी सकाळच्या सुमारास खासदार नारायण राणे यांच्या ओमगणेश निवासस्थानी घेण्यात आल्या. दुपारपर्यंत हे मुलाखतसत्र सुरू होते.
मुलाखती पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल्या. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुलाखतीसाठी कणकवली शहरातील विविध प्रभागातील मिळून जवळपास 30हून अधिक इच्छुक उमेदवार उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान मुलाखती पार पडल्या असल्या तरी भाजपची अंतिम उमेदवार यादी कधी जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




