राहाता:-शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला …जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला …जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

राहाता दि.९ प्रतिनिधी
आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भू मिका घेण्याचा प्रश्नच नाही.माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टिका करणे सोपे आहे.मात्र उध्दव ठाकरेनी शेतकऱ्यांसाठी एकतरी कारखाना किंवा उद्योग उभारला का ॽ आशा शब्दात जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.घेतलेल्या कर्जाची कोणतीही उत्पादकता होत नाही.यातून तेच पुन्हा कर्जबाजारी होतात.मात्र वक्तव्याचा अर्धाच भाग दाखवून मला शेतकरी विरोधी ठरवल्याच्या मोठ्या वेदना झाल्या.माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनात कधीही शेतकर्याच्या विरोधात माझी भूमिका किंवा वक्तव्य नाही.राज्यात कृषी मंत्री असताना सुरू केलेल्या असंख्य योजनांची आठवण आणि लाभ आजही शेतकर्याना मिळत असल्याचे सभाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकर्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ३२हजार कोटींचे पॅकेज नुसते जाहीर केले नाही तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली.अहील्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७२ कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,माझ्या विधानाचा आणि कारखान्याचा काय संबंध आमचा कारखाना सुरू होवून ७५ वर्ष झाली.उध्दवजीनी एखादा तरी कारखाना सुरू केला किंवा चालवून दाखवला काॽटिका करणे सोपो आहे.शेतकरी हिताचा एखादा उद्योग किंवा किमान बंद पडलेला कारखाना चालवायला घेवून दाखवावा असा टोला लगावून “उचलली जीभ लावली टाळ्याला” एवढेच त्यांचे काम आहे.
अडीच वर्ष राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली पण एकही शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही.मराठवाड्यात जावून हेक्टरी ५०हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला.
संघाच्या माध्यमातून शिवसेना संपविण्याच्या झालेल्या आरोपांवर बोलतांना मंत्री विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यांना भाजपाचे पाठबळ होते हे जगजाहीर आहे.आता किती दिवस तुम्ही शिळ्या कढीला उत आणणार आहात तुमच्याकडे तुमच सांगण्यासाठी काहीच राहील नाही.त्यांच्या घरावर कोण घिरट्या घालतय मला माहीत नाही,पण उध्दव ठाकरे स्वताभोवती घिरट्या घेत असावेत आशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
या राज्यातील शेतकर्याची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यामातून प्रयत्न होत आहे.यापुर्वी वाढवलेल्या हमीभावाच्या निर्णयाचा मोठा लाभ शेतकऱ्यांना झाला.प्राकृतिक शेतीला प्राधान्य दिले जात असून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच जून २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याच्या आश्वासनाची पूर्तता निश्चित होईल याची काळजी बाळासाहेब थोरातांनी करू नये, त्यांनाच कोणी वाली राहीला नसल्याची मिश्कील टिपणी त्यांनी सरकावर केलेल्या आरोपांवर केली.




