आष्टी:-आमचा जीव जायच्या आधी; तुमचा प्राणी तुम्ही घेऊन जाः समाजसेवक परमेश्वर घोडके यांची मागणी.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आमचा जीव जायच्या आधी; तुमचा प्राणी तुम्ही घेऊन जाः समाजसेवक परमेश्वर घोडके यांची मागणी.

आष्टी
आष्टी तालुक्यातील सुलेमान येथे आठ दिवसांपासून मुक्कामी असलेल्या बिबट्यांनी शेतकरी भयभीत झाले असून शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.
वनविभागाकडुन बिबट्यांचे वास्तव असलेल्या ठिकाणाची पाहणी शुक्रवारी दुपारी करण्यात आली. जनजागृती देखील करण्यात आली. पण आमचा जीव जायच्या आधी; तुमचा प्राणी तुम्ही घेऊन जा अशी मागणी समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा, भोजेवाडी या परिसरात बिबट्याचे वास्तव असून आठ दिवसांपासून मुक्कामी असल्याचे बोलले जात असताना. खबरदारीच्या अनुषंगाने आष्टी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी आठ कर्मचाऱ्यांचे पथक दुपारी गावात दाखल झाले. त्यानंतर बिबट्याचे वास्तव असलेल्या ठिकाणची पाहणी करून खबरदारी कशी घ्यावी. काय करावे, काय करू नये, याविषयी जनजागृती केली. त्यानंतर येथील समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके म्हणाले की, साहेब तुमच्या वनविकरणाला आमचा काडीचाही त्रास नाही. १९८५ पासून फांदीही तोडली नाही. आमचा तीळभर देखील तुम्हाला त्रास नाही
मग हा तुमचा प्राणी आहे. तुम्ही तो आमचा जीव जायच्या आधी घेऊन जावा असे सांगितले.
यावेळी आष्टी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक के. बी. विधाते, अशोक काळे, बाबासाहेब शिंदे, किरण पडंलवार, वनमजूर शेख, पाथरीभकर, पवार, युनूस शेख याच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.




