क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच मेंढ्या, बोकड व शेळया चोरी करणारी टोळी जेरबंद, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाची कारवाई.

पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच मेंढ्या, बोकड व शेळया चोरी करणारी टोळी जेरबंद, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाची कारवाई.

श्रीरामपूर दिनांक ८/११/२०२५
अप्पर पोलीस अधीक्षक .कार्यालय ;श्रीरामपूर;
जिल्हा अहिल्यानगर.

प्रस्तुत प्रकरणी हकीगत अशी की, दि.१८/१०/२०२५ रोजी दुपारी ०३/०० ते दि.१९/१०/२०२५ रोजी सकाळी ०७/०० वा.चे दरम्यान विजय दिगंबर उंडे यांचे मातापुर ता. श्रीरामपूर येथील जाळीचे कंपाउड मध्ये असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये ठेवलेले एकूण ५३ गोण्या अंदाजे २६ क्विंटल सोयाबीन एकूण १,०४,०००/- रू.किं.चे कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इरादयाने जाळीचे कंपाऊंडचा दरवाजा तोडून शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या स्वतःचे फायदयाकरीता चोरून नेल्या होत्या म्हणुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दि.२९/१०/२०२५ रोजी *गु.र. नं. ९५०/२०२५ भा.न्या.सं.कलम ३०३(२)* प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती, तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरून सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे *सागर गोरख मांजरे* याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांचे पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी *१)सागर गोरख मांजरे वय २८ रा.मातापुर ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर २)गणेश उर्फ स्वप्निल रवींद्र शिरोळे वय ४० रा.मातापुर ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर* यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार *३)दिलीप भीमा जाधव वय २६ रा.सायखेडा ता.निफाड जि.नाशिक ४) योगेश भुराजी भवर वय २६ रा.सायखेडा ता. निफाड जि.नाशिक ५) प्रशांत मुरलीधर धात्रक रा.तुळजाभवानी नगर पंचवटी नाशिक (फरार)* अशांनी मिळुन केला असुन आरोपींकडे विचारपुस करता आरोपी हे यापुर्वी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांनी प्रथमत: साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली नंतर रात्री उशीरा नाशिकवरून आपल्या साथीदारांना छोटा हत्ती वाहनासह बोलावले व शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरून नेल्या हे करत असताना चारचाकी वाहनाचा आवाज होऊ नये म्हणुन गाडी बंद करून शेडपर्यंत लोटत घेवुन गेले व गाडीत गोण्या भरल्यानंतर चोरी करून सोयाबीन व्यापाऱ्याला विकली आहे. आरोपी क्र.१ ते ४ यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले *१९ क्विंटल २६ किलोग्रॅम सोयाबीन ६७,४१०/- रू.* किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/ प्रसाद साळवे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदर गुन्ह्यातील तपासादरम्यान पथकातील अंमलदार यांनी चौकशी करत असताना सदर आरोपींनी दि.११/०६/२०२५ रोजी रात्री उंबरगाव शिवारात शेतातील जाळीचे शेड मधून १५ मेंढ्या,१ बोकड व १ शेळी चोरल्याचे कबूल केले असून *श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ५७७/२०२५ बी.एन.एस. ३०५(अ) प्रमाणे* हा गुन्हा उघड झाला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी सराईत असून त्यांचे वर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

*आरोपी :- सागर गोरख मांजरे, रा.मातापुर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर.*

*१) पोलीस स्टेशन -* तोफखाना.
▫️गु.र.नं व कलम – ५६९९/२०२० IPC ३७९.

*२)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -* ७४४७/२०२० IPC ३७९

*३)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
२४८/२०१९ IPC ३७९,४११

*४)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
२८२/२०१९ IPC ३७९

*५)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
६०४/२०१९ IPC ३७९

*६)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
४९/२०१९ IPC ४६१,३८०

*७)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
१९५/२०१७ IPC ४५७,३८०

*८)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
५५६/२०१७ IPC ३९९,४०२

*९)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
४२२/२०१७IPC४५४,४५७,३०

*१०)पोलीस स्टेशन -* तोफखाना.
*▫️गु.र.नं व कलम -*
३५०/२०१७ IPC ४५७,३८०

*११)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
९५०/२०२५ BNS ३०३(२)

*१२)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
५७७/२०२५ BNS ३०३(अ)

*१३)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
१७०/२०२०IPC३९७,३९२,
५०४ वगैरे

*१४)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -* २२५/२०१९ IPC ३७९

*१५)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
३५४/२०१९ IPC ३९४,३९५

*१६)पोलीस स्टेशन -*
कोपरगाव शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
१७१/२०२० IPC ३९७,३४ वगैरे

*१७)पोलीस स्टेशन -*
कोपरगाव शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
८४२/२०१९ IPC ३७९

*१८)पोलीस स्टेशन -*
राहुरी.
*▫️गु.र.नं व कलम -*
८९३/२०१९ IPC ३९९

*१९)पोलीस स्टेशन -*
राहुरी.
*▫️गु.र.नं व कलम -*
०४/२०२२ IPC ३७९

*२०)पोलीस स्टेशन -*
लोणी.
*▫️गु.र.नं व कलम -*
२६६/२०२० IPC ३९५,३९७

*२१)पोलीस स्टेशन -*
लोणी.
*▫️गु.र.नं व कलम -*
८३७/२०२० IPC ३९५,४९२ आर्म ॲक्ट ४/२५

*२२)पोलीस स्टेशन -*
एम.आय.डी.सी.
*▫️गु.र.नं व कलम -*
६९९/२०२१ IPC ३९५,३२४,४५२,४२७

*२३)पोलीस स्टेशन -*
एम.आय.डी.सी.
*▫️गु.र.नं व कलम -*
१६७/२०१९ IPC ३९९,४०२

*आरोपी:- योगेश भुराजी भवर, रा. सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक.*

*१)पोलीस स्टेशन -*
सायखेडा.
*▫️गु.र.नं व कलम -*
१०९/२०२५ BNS ११८(१),३५१(२) वगैरे

*२)पोलीस स्टेशन -*
आडगाव.
*▫️गु.र.नं व कलम -*
२६८/२०१९ IPC १६०

*३)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
१५०/२०२५ BNS ३०३(२)

*४)पोलीस स्टेशन -*
श्रीरामपुर शहर.
*▫️गु.र.नं व कलम -*
५७७/२०२५ BNS ३०५(अ)

*सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.ना. रामेश्वर वेताळ, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरडवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख पो.स.ई. समाधान सोळंके, पो.हे.कॉ. प्रसाद साळवे, पो.कॉ. अजित पटारे, पो.कॉ. संभाजी खरात, पो.कॉ. सचिन दुकळे, पो.कॉ. मच्छिंद्र कातखडे, यांनी केली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button