ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव :- पांढरवाडी सोसायटीच्या सचिवाकडून शेतकरी सभासदांच्या आर्थिक फसवणूकला न्याय मागण्यासाठी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी आणि शेतकरी सभासद यांची भेट.

प्रतिनिधी :- शिवाजी टिके महाराष्ट्र :-960 4808934

खटाव :- 18/06/2022 :- पांढरवाडी वि. का. स. सेवा सोसायटी सचिव उदय सूर्यवंशी आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा डिस्कळ , तालुका खटाव जिल्हा सातारा यांचेकडून झालेल्या शेतकरी सभासद आणि शासनाची आर्थिक फसवणुकीबाबत मा. बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री यांची भेट घेण्यात आली. सचिव उदय सूर्यवंशी आणि सातारा जिल्हा कर्मचारी आणि अधिकारी यांनी मिळून हि आर्थिक फसवणूक केल्याचे शेतकरी सभासदांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना सांगण्यात आले. या लोकांनी शासनाची आलेली कर्जमाफी तसेच लोकांनी भरणा करण्यास दिलेले पैसे तसेच परस्पर शेतकरी सभासदांच्या नावे कर्ज घेऊन स्वतः त्या कर्जाचा वापर केल्याचा आरोप शेतकरी सभासदांनी केला आहे. यासंदर्भात शेतकरी सभासदांनी लेखी स्वरूपात RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनकडे तक्रार केली असून पुरावे सादर केले आहेत. मा. प्रल्हाद चव्हाण यांनी शेतकरी सभासद यांच्या तर्फे हा विषय या प्रकरणांशी संबधीत अधिकारी आणि सहकार मंत्री यांच्याशी लेखी पत्रव्यवहार 19/05/2022 रोजी केला असून मा. बाळासाहेब पाटील यांच्याशी प्रत्येक्ष भेट घेऊन विचारणा केली असता अतिशय असमाधानकारक उत्तर मिळाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण निवडून येता त्यांच्या आत्महत्येविषय बोलू नका असे वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे. आपण आज लोकप्रतिनिधी , मंत्री आहात आपल्याकडे लोकांनी न्याय हक्कासाठी नाही यायचे तर जायचे कोठे? जो शेतकरी सभासदांच्या न्यायासाठी लढतो त्याला आपण दिशाभूल करत आहात असे बोलणे योग्य आहे का? असा परखड प्रश्न मा. प्रल्हाद चव्हाण यांनी केला आहे. या सर्व गोष्टी स्वतः शेतकरी सभासदांनी डोळ्यांनी अनुभवल्या. यासारखे महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव नाही. हा प्रकार फक्त पांढरवाडी आणि काळेवाडीचा नसून हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारबाबत काही ठोस निर्णय मा.प्रल्हाद चव्हाण RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हे घेणार असल्याचे बोलण्यात आले.शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button