आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कणकवली:-कलमठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ –  गावात स्वच्छता अभियानाचे वातावरण ; सरपंच संदीप मेस्त्री यांचा पुढाकार.

पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कलमठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ –
गावात स्वच्छता अभियानाचे वातावरण ; सरपंच संदीप मेस्त्री यांचा पुढाकार.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून कलमठ ग्रामपंचायतची वाटचाल सुरु आहे. त्यानुसार सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पुढाकारातून विविध नावीण्यपूर्ण उपक्रम शासनाच्या निर्देशानुसार राबवले जातात. त्यानुसार कलमठ येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत महोत्सव स्वच्छता मोहिमेचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. कणकवली आचरा मार्गावर लक्ष्मी चित्रमंदिर ते कलमठ बाजारपेठ पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. त्यामुळे गावात स्वच्छता अभियानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मोहिमेत सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड , ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार , अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री , स्वाती नारकर , श्रेयस चिंदरकर , सचिन खोचरे, गुरु वर्देकर , स्वरूप कोरगावकर आबा कोरगावकर , तेजस लोकरे ,विलास गुडेकर, पप्पू कोरगावकर ,ओंकार मेस्त्री,आबा मेस्त्री ,दिनार लाड ,अक्षता करंजेकर , पूजा हुन्नरे , विभावरी कांबळे ,सान्वी कुडाळकर , अक्षता लाड , प्राची पवार , शर्मिला चव्हाण, राजश्री शिर्के, सुनीता पाटकर ,सुलभा कदम , रत्नावली लाड , शुभांगी सावंत , रूपेश कदम , मंगेश कदम , आरती गुरव,गणेश सावंत , अण्णा सावंत , ज्योती आमडोसकर, अंकिता राणे , नमिता मठकर ,रमेश चव्हाण , मनोज घाडी ,गौरव तांबे , मोहन तांबे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले.
या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत महोत्सव व स्वच्छता अभियान मोहिमेअंतर्गत गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. आजारांचा प्रसार रोखणे, प्लास्टिकमुक्त गाव घडवणे , शाश्वत विकासाला चालणा देणे , रस्ते , बसस्थानके , शाळा , मंदिर परिसर स्वच्छ करणे , कचरा संकलन करुन त्याची विल्हेवाट लावणे , प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी जनजागृती करणे , घराघरांत ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे , गावात जमा झालेल्या कचºयातून कंपोस्ट खत निर्मिती करणे या सगळ्या उपक्रमांतून ग्रामस्थ , महिला बचतगट, युवक मंडळे, शाळा , अंगणवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सहभाग घेवून अभियान यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे श्री. मेस्त्री यांनी सांगितले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button