श्रीरामपूर:-साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथील कुंटणखान्यावर पिटा कायदयांतर्गत गुन्हा दाखल, ३ पिडीत महिलेची सुटका करुन हॉटेल मालक व मॅनेजर असे २ आरोपी अटक, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाची कारवाई.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीरामपुर दि. ३०/१०/२०२५
साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथील कुंटणखान्यावर पिटा कायदयांतर्गत गुन्हा दाखल, ३ पिडीत महिलेची सुटका करुन हॉटेल मालक व मॅनेजर असे २ आरोपी अटक, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाची कारवाई.

दिनांक २९/१०/२०२५ रोजी सकाळी मा.श्री.सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथे अज्ञात इसम स्वतःचे आर्थिक फायादयाकरीता मुलीना पैशाचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन सदर हॉटेल लॉजिंगवर जागा उपलब्ध करुन त्यांचेकडुन कुंटणखाना (बेश्याव्यवसाय) चालवित आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण यांना सुचना देवुन पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांची मदत घेवुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोलीस अंमलदार यांनी दिनांक २९/१०/२०२५ रोजी नेवासा पोलीस स्टेशनला येवुन पो.नि. महेश पाटील यांचो भेट घेवुन त्यांना गोपनिय माहितीदाराने दिलेल्या खवरीबाबत माहिती दिली. त्यानंतर पो.नि. महेश पाटील यांनी दोन पंचाना व म.पो.स.ई. श्रध्दा वैदय, मपोकों वर्षा कांबळे दोघे नेमणुक नेवासा पो.स्टे. यांना बोलावुन त्यांना साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथे अज्ञात इसम महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित असेलबाबत गोपनिय माहिती मिळाली असुन सदर ठिकाणी कारवाई करणे करीता जाणे असलेबाबत कळवुन नमुद पथक बनवुन छापा कारवाई करणेकरीता रवाना झाले.
नमुद पथकाने साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पो.नि. महेश पाटील यांनी एका खाजगी इसमास बोलावुन घेवुन त्यास गोपनिय बातमीवावत माहिती देवून बनावट ग्राहक म्हणुन पाठविले, पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबावत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील इसम नामे १) बाळासाहेव भानुदास जाधव, वय २५ वर्ष, रा.मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (हॉटेल मालक) २) विकास योगेश उर्फ यहुवा औताडे, वय २५ वर्ष, रा.मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (हॉटेल मॅनेजर) यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका रूममध्ये १ व एका रुम मध्ये २ महिला मिळून आल्या. नमृद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी आम्हास वेश्या व्यवसाय करून ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हास पैस देतात व आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पेशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली. नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केलेली आहे.
साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे १) बाळासाहेव ‘भानुदास जाधव, वय २५ वर्ष, रा. मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर २) विकास योगेश उर्फ यहुवा औताडे, वय २५ वर्ष, रा. मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ३ महिलांकडून कुंटणखाना चालवतांना मिळून आल्याने त्याचेविरूध्द पो.ना. संदिप दरंदले, नेम. श्रीरामपुर शहर पो.स्टे. हल्ली अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन गुरनं ९१७/२०२५ स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश S पाटील, लेखासा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.




