साताऱ्यात अर्धनग्न आंदोलनाच्या दणक्याने शासकीय कार्यालयातील ए.सी.गारठला..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
साताऱ्यात अर्धनग्न आंदोलनाच्या दणक्याने शासकीय कार्यालयातील ए.सी.गारठला..
सातारा दि: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय कारभार म्हणजेच हम करे सो कायदा साताऱ्यात लागू झाला होता. परवानगी नसताना वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले होते. यावर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील शिंदे यांनी अर्ध नग्न आंदोलन केले. त्याची दखल घेऊन आता अनावश्यक वातानुकूलित यंत्र काढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शासकीय कार्यातील काही ए.सी. वातानुकूलित यंत्र बंद अवस्थेत गाठून गेले आहेत.
याबाबत माहिती अशी की साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील शिंदे यांनी शासकीय कार्यालयात लेखी पत्र पाठवून शासनाचा आदेश जोडला होता तसेच २७ ऑक्टोंबर पासून अर्धनग्न आंदोलन जाहीर केले होते. तरीही काही प्रशासकीय अधिकारी वातानुकूलित यंत्राचा गार वारा घेऊन जनतेची पिळवणूक करत होते .अखेर आंदोलनाला उदंड प्रतिसाद लाभत असल्याने अखेर सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील विनापरवानगी वातानुकूलित यंत्र काढण्यास सुरुवात झाली आहे. हे आंदोलक श्री सुनील शिंदे यांचे यश मानले जात आहे.
शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसविण्याबाबत, सामान्य प्रशासन विभागाचा २५ मे २०२२ चा शासन निर्णय असूनही विनापरवानगी काही शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्र बसवण्यात आले. त्याबाबत निवेदन दिल्यानंतर पाच महिन्याने दिनांक २७ ऑक्टोंबर २०२५उपरोक्त विषयास अनुसरून सातारा जिल्हा परिषद कार्यालय सातारा मधील अधिकारी यांच्या दालनामधील तसेच सभागृहमध्ये बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रे (AC) काढणे बाबत हालचाली सुरू झाल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ही अधिकाऱ्यांनी काही वातानुकूलित यंत्र काढल्याचे पत्र आंदोलकांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसविण्याबाबत, सामान्य
प्रशासन विभागाच्या २५ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी S-३० (रु.१,४४,२०० ते २,१८,२०० ) किंवा त्याहून अधिक असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये दालनात वातानुकूलित यंत्रे बसवण्याची परवानगी आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील ज्या कार्यालयप्रमुखांच्या दालनामध्ये वातानुकूलित यंत्रे बसवण्यात आलेले आहेत. अशा कार्यालयप्रमुखांना शासन निर्णयाचे अवलोकन करण्यात आले. तसेच दि २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रोजी सातारा जिल्हा परिषद कार्यालय प्रमुखांना वातानुकूलित यंत्रे
काढणे बाबतची संमती/परवानगी मिळणे बाबत उपअभियंता जि प बांधकाम उपविभागमार्फत पत्र निर्गमित करण्यात आले. तरी सदर पत्राबाबत विभाग प्रमुखांची लेखी संमती प्राप्त झाल्यानंतर दि १५ नोव्हेंबर रोजी२०२५ पर्यंत वातानुकूलित यंत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी कार्यालये, व्ही.सी. रूम, सभागृह इत्यादी ठिकाणी बसविणेत आलेले ए.सी.
काढणेबाबत वरील संदर्भीय क्र २ मधील शासन निर्णयामध्ये स्पष्ट सुचना निर्गमित करणेत आले आहेत. असे पत्र दिलेले आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, राजेंद्र ओव्हाळ,रिपब्लिकन पॅंथर सेनेचे आदित्य गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते जयवंत कांबळे यांच्यासह मान्यवरांनी पाठिंबा दिला होता.





