वाई-परखंदी:- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत झालेल्या डांबरीकरण कामाची तपासणी करून ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
परखंदी:- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत झालेल्या डांबरीकरण कामाची तपासणी करून ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी.

सातारा.वाई.
दिनांक – 15/10/2025
दलित व शोषित समाजाला मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. वाई तालुक्यातील परखंदी येथे येत मुख्य रस्त्यापासून बौद्ध वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते ,सदरचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे केलेल्या असून काही महिन्यात ते समोर आले आहे. संबंधित रस्त्याला असणाऱ्या ओढ्यावर असणाऱ्या छोट्या पुलावरील बहुतांश डांबरीकरण पाण्याने धुवून गेल्याचे दिसते . यावरूनच कामाचे कॉलिटी किती उत्तम दर्जाचे आहे हे समजतेच तरही सदर कामाचे तात्काळ चौकशी करून त्या कामासाठी वापरण्यात आलेल्या सर्व मटेरियल चे प्रयोगशाळा चाचपणी अहवाल चेक केले जावे. सदर काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे हे स्थळ पाहणी करता समजून येते त्यामुळे आपण संबंधित ठेकेदाराला सदर काम पुन्हा व्यवस्थित स्वरूपात करून देण्याचे आदेश द्यावेत किंवा निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे सदर ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व सदर काम दुरुस्त करून देण्यात यावे अन्यथा वाई पंचायत समिती अंतर्गत दलित वस्तीमध्ये होणाऱ्या बोगस कामांपैकी हे अजून एक काम पुढे आले आहे व याच्या विरोधात तीव्र निषेध येणाऱ्या काळात व्यक्त केला जाईल या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, युवक अध्यक्ष आकाशभाई गायकवाड, युवक उपाध्यक्ष रोहित बंडा कवळे, विशाल जाधव आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.




