वाई:-शब्दांची भरती करणारे खूप भेटतील, पण शब्द पाळणारे कमी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शब्दांची भरती करणारे खूप भेटतील, पण शब्द पाळणारे कमी.

शब्द दिल्यावर ते पूर्ण करणारे क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट वाई यांनी आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळा क्रमांक 7 या शाळेला ब्लूटूथ माइक विथ स्पीकर दिला. काही दिवसापूर्वी त्यांनी दिलेला शब्द आज पूर्ण केली. विद्यार्थ्याना या साहित्याची शैक्षणिक प्रगती करण्यास नक्कीच मदत होईल.क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट यांचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्री प्रकाश खडसरे सर, सचिव श्री विजय कर्णे सर ,सहसचिव सौ.खडसरे मॅडम, खजिनदार श्री सुनील बोडके सर,विश्वस्त सदस्य श्री आनंदराव हमीद सर,श्री नितीन नाईकवाडे सर,श्री अजित ननवरे सर,श्री संजय राजापूर सर,सौ.पल्लवी झोरे मॅडम यांचे सर्वांचे सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळा क्रमांक 7 शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद च्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.




