कणकवली:-फोंडाघाट रस्त्याची डागडुजी करा; अन्यथा आंदोलन राष्ट्रवादी (श.प.) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
फोंडाघाट रस्त्याची डागडुजी करा; अन्यथा आंदोलन
राष्ट्रवादी (श.प.) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा.

॥ कणकवली: फोंडघाटमधील
रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी (श.प.) च्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फोंडाघाट येथील रस्त्याची दुर्दशा आहे. हा मुख्य रस्ता घाटमार्गाला जोडणार आहे. सध्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. देवगड-निपाणी राज्य महामार्ग रस्त्याचे काम सुरू आहे. त्याचे
एका कंपनीला मिळालेले आहे. कंपनीकडून चुकीच्यापद्धतीने काम होत असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. त्यातच कंत्राटदार निकृष्ट दजार्चे करीत आहे. रस्त्याचे काम करत असताना घाट रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेतलेली नाही.
त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.




