वाई:-इंडियन डेंटल असोसिएशनच्या वाई – पाचगणी शाखेची स्थापना.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष


माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
इंडियन डेंटल असोसिएशनच्या वाई – पाचगणी शाखेची स्थापना.

वाई,ता.३:- इंडियन डेंटल असोसिएशन
(आय.डी.ए) च्या नवीन वाई – पाचगणी शाखेची स्थापना करण्यात आली. ‘आयडीए’चे सह चिटणीस डॉ अशोक ढोबळे (लातूर – मुंबई ) यांच्या हस्ते शाखेच्या लोगोचे अनावरण करून शुभारंभ झाला.
यावेळी नूतन अध्यक्ष डॉ मोहन झगडे, सचिव डॉ. अमर कित्तूरकर, सहसचिव
डॉ.अमित जमदाडे तसेच नियोजित अध्यक्ष डॉ. पराग लांबाडे, उपाध्यक्ष डॉ. विलास खरात व डॉ.अर्चना केळकर
खजिनदार डॉ आशिष चोपडे यांच्यासह सर्व सदस्यांनी पदभार स्विकारला.
याप्रसंगी वाईतील पहिले दंतचिकित्सक म्हणून डॉ. त्रिंबक व डॉ. कुसुमताई गोखले व डॉ. यशवंत रघुनाथ केळकर यांच्या परिवारांचा गौरव करण्यात आला.
संघटनेच्या वाटचाली विषयी बोलताना
डॉ. ढोबळे यांनी चार सदस्यांवर १९७५ संघटना सुरू झालेल्या या संघटनेचे आज ४ लाख सदस्य झाले आहेत. देशाची गरज ओळखून संघटनेने पुढाकार घेऊन विविध शहरात वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली. परंतु आज ग्रामीण भागात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून दंतचिकित्सक यांच्या समोर अनेक आव्हाने आहे. त्यासाठी
ग्रामीण भागात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ओरल हेल्थचे नवीन धोरण आखण्याची खरी गरज आहे. ग्रामीण आरोग्याचा पाया मजबूत करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता आहे.
त्याची जबाबदारी संघटनेच्या माध्यमातून घेण्यासाठी शाखा विस्तार महत्वाचा असल्याचे सांगितले.
यावेळी मॅक्झिलो फेशियल सर्जन डॉ. विजय देशमुख (संभाजीनगर ) यांनी ओरल कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रमोद गुरव, डॉ नितीन बर्वे, डॉ विकास पाटील, डॉ. अजित कदम, डॉ. वैभव भुजबळ (सातारा) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, योगिनी गोखले यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. सौ अर्चना केळकर यांनी शाखेने यापूर्वीच आपले कामकाज सुरू केले असून वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबविण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती दिली. डॉ. झगडे यांनी प्रस्ताविक केले. डॉ.मधुसूदन मुजुमदार, डॉ.अनिरुद्ध बारगजे, डॉ.पराग सपकाळ, डॉ. श्रेयांश जैन यांनी स्वागत केले.डॉ. सिद्दिका कोचळे, डॉ.रेणूका झगडे, डॉ.संपदा बाचल, डॉ. गीतांजली लांबाडे, डॉ.मयुरा सणस यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमास वाई, पाचगणी परिसरातील सर्व डेंटिस्ट, शहरातील रोटरी क्लब, आय.एम. ए. आणि निमा संघटनेचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
——
फोटो खालील ओळी :-
इंडियन डेंटल असोसिएशन
(आय.डी. ए) चे सह चिटणीस डॉ अशोक ढोबळे यांच्या समवेत वाई – पाचगणी शाखेचे अध्यक्ष डॉ.मोहन झगडे, सचिव डॉ.अमर कित्तूरकर यांच्यासह सर्व सदस्य. )




