देगलूर:-(अकोला)-प्रज्ञा 13वे साहित्य संमेलन मध्ये रघुनाथ ढोक समाज शिरोमणी पुरस्काराने झाले सन्मानित. !!!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण


ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
प्रज्ञा 13वे साहित्य संमेलन मध्ये रघुनाथ ढोक समाज शिरोमणी पुरस्काराने झाले सन्मानित. !!!

देगलूर : प्रज्ञा बहुउद्धेशीय संस्था , अकोला ,महाराष्ट्र तर्फे 13 वे राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन ,देगलूर – 2025 रविवार दि.5 ऑक्टोंबर 25 रोजी सिद्वेश्वर रिसॉर्ट ,देगलूर जि.नांदेड येथे सकाळी 8 ते सायं.6 पर्यंत मोठ्या दिमाखात ग्रंथ दिंडी ,कवी व गझल गायनाने संमेलन पार पडले.ग्रंथ दिंडी मध्ये रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करून ती दिंडी स्वतः खांद्यावरून संमेलन स्थळी नेल्याने अलौकिक वातावरण निर्माण झाले होते त्यांचे सोबत अनेकांनी फोटो काढले.त्यानंतर संमेलनात समाजसेवक रघुनाथ ढोक यांना समाज शिरोमणी पुरस्कार संस्थेचे सचिव व ज्येष्ठ कवी मकरंद घाणेकर यांचे शुभहस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आणि. शाल पुष्पगुच देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मुंबईचे ज्येष्ठ कवी लेखक बाबा ठाकूर व फलटण चे ज्येष्ठ कवी डॉ.सुधाकर बेंद्रे तसेच संस्थापक जेष्ठ लेखिका , कवियत्री सौ.लीनाताई देगलूरकर उपस्थित होते.
यावेळी आयोजक म्हणाले की
रघुनाथ ढोक यांना हा पुरस्कार देण्या मागचे कारण म्हणजे या आधुनिक काळात व विज्ञानयुगात सर्व गोष्टीची सत्यता कळून देखील सर्व जाती धर्मातील लोक व मोठ्या संखेने बहुजन समाज घरातील सर्व कार्यासाठी पंचांग , मुहुर्थ , अंधश्रद्धा आणि कर्मकांड पाहून विधी कार्य पार पाडत आहेत.
अशा परिस्थितीत ढोक हे महात्मा फुले यांची विचारधारा आत्मसात करून स्वतः घरातून सत्यशोधक कार्य करीत त्यांनी महाराष्ट्र व इतर राज्यात जाऊन समाज प्रबोधनाचे कार्य गेली अनेक वर्ष करीत आहेत,त्यामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान ,नाहक वेळ वाचला आहे तसेच त्याचा सत्यशोधक विधी कार्याने अंधश्रद्धा व कर्मकांड कमी होण्यास देखील मदत होत आहे.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक सत्कारास उत्तर देताना म्हणाले की गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र व तेलगांना राज्यात सत्यशोधक विवाह एकूण 53 आणि 15 गृहप्रवेश / वास्तू सोहळे व इतर सत्यशोधक विधी कार्य मोफत विधीकर्ते म्हणून अनेक महापुर्षांचे जयंतीदिनी , स्मृतिदिनी व महनीय दिनी विधीकार्य पार पाडले तसेच अनेक प्रथम स्मृतिदिनानिमित नातेवाईक व स्वतःचे आई वडील यांचे प्रबोधनात्मक कृतीशील सामजिक उपक्रम राबवून कार्यक्रम यशस्वी केले म्हणूनच माझी या पुरस्कार साठी निवड झाले वाटते.मात्र या पुरस्काराचे नाव समाज शिरोमणी नाव असल्याने मानसिक आनंद तर झालाच सोबत मोठी जबाबदारी वाढल्याची देखील जाणीव झाली आहे. समाजाचे अजून जास्त प्रबोधन करीत साहित्य क्षेत्रात व सत्यशोधक कार्य देशभर गेले पाहिजे ही प्रज्ञा संस्थेची इच्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी मकरंद हळदणकर तर आभार प्रदर्शन आयोजक कवी अनिल कुलकर्णी यांनी मानले.




