सिंधुदुर्ग:-कुडाळ:- स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1) कुडाळ:- स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त.

कुडाळ:- स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला कुडाळ येथील एका पान टपरीवर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार इमरान शमसुद्दीन करोल, इम्तियाज शमसुद्दीन करोल (दोघेही राहणार करोलवाडी, कुडाळ), आरिफ करोल (रा. शिवाजीनगर, कुडाळ), समीर पठाण (रा. हुबळी, कर्नाटक) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३,३ (५), अन्न सुरक्षा मानके कलम ५९ अनुसार कारवाई करण्यात आली आहे.
2)कणकवली:-सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तिथे दाखला हा उपक्रम.

कणकवली:-सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तिथे दाखला हा उपक्रम सध्या राबविला जात असून या उपक्रमा अंतर्गत तसेच सेवा पंधरावडाच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील २५८ शाळांमध्ये वय अधिवास व जातीचा दाखला देण्याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात या उपक्रमांतर्गत १० हजार अर्ज आले आले असून, आतापर्यंत ४ हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली आहे.
3)सावंतवाडी:- भाजपातून काल रात्री राजीनामा दिलेले शक्ती केंद्रप्रमुख देवानंद खवणेकर यांनी आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्य.

सावंतवाडी:- भाजपातून काल रात्री राजीनामा दिलेले शक्ती केंद्रप्रमुख देवानंद खवणेकर यांनी आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हाती धनुष्य घेतला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत पक्षप्रवेश केला आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा धक्का मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत असणाऱ्या भाजप व शिवसेना यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. प्रमुख नेत्यांची वक्तव्य यावर शिक्कामोर्तब करत असून भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखाने काल रात्री पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आज सकाळी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आरोंदा येथील ग्रामस्थांसह त्यांनी सेनेत प्रवेश केला.
4)सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई – माजगाव – गोठणेश्वर येथे नाकाबंदी दरम्यान एका महिंद्रा झायलो वाहनातून (क्र. GA 03R- 7793) सुमारे 290 किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दोन आरोपींना अटक.

सावंतवाडी:-सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. माजगाव-गोठणेश्वर येथे नाकाबंदी दरम्यान एका महिंद्रा झायलो वाहनातून (क्र. GA 03R- 7793) सुमारे 290 किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दोन आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.
ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळेत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मांस कर्नाटकातून गोव्याकडे नेले जात होते. नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळावरून वाहनचालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.




