वाई:-भुईंज येथे अन्न प्रक्रिया उदयोगाची कार्यशाळा संपन्न.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भुईंज येथे अन्न प्रक्रिया उदयोगाची कार्यशाळा संपन्न.

मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, भुईंज अधिनस्त सर्व गावातील इच्छुक नव उद्योजक, युवक, महिला, शेतकरी गट इ साठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा मारुती मंदिर,बदेवाडी येथे पार पडली.
यावेळी जिल्हा संसाधन व्यक्ती श्रीमती शाकेरा पटेल यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली व कोणकोणते नवीन व्यवसाय करू शकतो याबाबत चर्चात्मक संवाद साधला. बँक ऑफ महाराष्ट्र भुईंज शाखेचे व्यवस्थापक श्री विश्वजित पाटील यांनी योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी कर्जमंजुरी प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे याबाबत माहिती दिली. या योजनेतून लाभ घेतलेल्या शिरगाव येथील यशस्वी महिला उद्योजक सौ सुवर्णा चव्हाण यांनी मनोगतातून या योजनेचा फायदा आणि कृषी विभागाकडून मिळालेले बहुमोल मार्गदर्शन याबाबत समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतातून मंडळ कृषी अधिकारी श्री निखिल रायकर यांनी या योजनेचे शेवटचे वर्ष असून जास्तीत जास्त व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा व यासाठी कृषी विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उप कृषी अधिकारी श्री बनकर यांनी तर आभार प्रदर्शन सहायक कृषी अधिकारी श्री जगदाळे यांनी केले. या कार्यशाळेसाठी कार्यालयाचे उप कृषी अधिकारी श्री शेलार, सर्व सहायक कृषि अधिकारी व विविध गावातील इच्छुक उद्योजक यांची उपस्थिती होती.




