महाबळेश्वर:-२६ नोव्हेंबर १९४९भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नोव्हेंबर १९४९भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस.
दिनांक २६/नोव्हेंबर/२०२५ भारतीय संविधान दिन महाबळेश्वर येथे सर्व समाज बांधव यांच्या वतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेऊन संविधानाचे वाचन करन्यात आले .या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तालुका अध्यक्षा नंदा ताई वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव, भीम क्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव संतोष जाधव व समता सैनिक दलाचे सैनिक व समाज बांधव उपस्थित होते.
एक छोटासा संदेश
दिनांक २६/नोव्हेंबर/१९४९ भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस.काय झाले या दिवशी?????
या दिवशी दिनांक २६/११/१९४९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे चेअरमन,यांनी, अहोरात्र मेहनत करून रक्ताचे पाणी करून, २ वर्ष ११महिने १७ दिवस भारतीय संविधान एकट्याने तयार करून भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, यांना सुपूर्द केले आहे तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. सर्व समाज बांधवांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा .
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना जसे अधिकार दिले आहेत तसे नागरीकांना कर्तव्य सुद्धा आहे, त्या कर्तव्यांची अंमलबजावणी नागरीकांनी करावे जागृत राहावे,व न्याय व हक्कासाठी संघर्ष करत राहावे.
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.
जनहीतार्थ जारी,समाज संरक्षणासाठी, देशहीतासाठी, राष्ट्रहीतासाठी,
शुभेच्छुक -उत्तम भालेराव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तालुका महाबळेश्वर.




