
शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न …
प्रतिंनिधी : अनमोल गुरव खटाव 9881355582
चोराडे,ता.खटाव जि. सातारा जि.प.शाळा. येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रथम इ.पहिलीचे विध्यार्थी- विध्यार्थिनी यांचे प्रथम स्वागत करून त्यांना शालेय उपयोगी वस्तू वह्या-पुस्तके वाटप करण्यात आले . तसेच इ.दुसरी ते इ. चौथी पर्यंतच्या सर्व विध्यार्थी- विध्यार्थिनी यांना सुद्धा वह्या-पुस्तके वाटप करण्यात आले .
या मेळाव्यास मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग,अंगणवाडी सेविका, शिक्षण समिति अध्यक्ष,उपाध्यक्ष,समितीचे सर्व सदस्य,उपसरपंच,तसेच इतर मान्यवर,पालकवर्ग व चोराडे ग्रामस्थ उपस्थित होते.