ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवनिर्वाचित नायब तहसीलदार आयु.प्रतीक आढाव यांचा गोखळी येथे नागरी सत्कार.

प्रतिनिधी :- शुभम भापकर फलटण

“नवनिर्वाचित नायब तहसिलदार आयु.प्रतिक आढाव यांचा गोखळी येथे नागरी सत्कार…” गोखळी दि.१४/०६/२०२२:- गुणवरे गावचे सुपुत्र आयु.प्रतिक आढाव यांची नायब तहसिलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल गोखळी येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गोखळी गावचे भूषण कार्यसम्राट मा.सरपंच श्री.नंदकुमार मामा गावडे, मा.उपसरपंच डॉ.अमित गावडे, कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गोखळी गावचे आदरार्थी संजयकुमार बाचल साहेब, सेवानिवृत्त देशसेवक मेजर अशोक जगताप, शिवसेना विभाग प्रमुख अजितदादा धुमाळ, लहूजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष आकाश बागाव, भाजपा कार्यकर्ते वस्ताद प्रदीप आटोळे, शरयू अॅग्रोचे डीस्लरी व्यवस्थापक दादासो जगताप, सामाजिक कार्यकर्ते राहुल गावडे, सुनिल धुमाळ, स्वप्निल पवार, ज्ञानेश्वर तिवाटने, तुषार गेजगे, पवन जगताप, शहारूक शेख, संदीप हरिहर इत्यादी. तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हे पारंपारिक वाद्य वाजवून तसेच फटाक्यांच्या आतेशबाजीने करण्यात आले तसेच प्रथमत: थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती आयु.प्रतिक आढाव साहेब यांचा नागरी सत्कार करण्यात आला.त्यानंतर शेखर लोंढे, डॉ.गणेश गावडे, संजयकुमार बाचल इत्यादींनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर सत्कारमूर्ती यांचे तरुणांना मार्गदर्शनपर व मी कसा घडलो याबाबत जिवनपट त्यांनी व्यक्त केला तसेच शेवटी मेजर अशोक जगताप यांनी अभार मानले व चहा,नाष्टा अल्पोपहारा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली..!

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button