सातारा:-शाहूपुरी पोलिसांच्या कर्तबगारीने पोलिसांची वाढवली शान…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शाहूपुरी पोलिसांच्या कर्तबगारीने पोलिसांची वाढवली शान…

सातारा दि: सातारा शहरा म्युझिक शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला सुरक्षाबाबतीत शाहूपुरी पोलिसांनी कर्तबगारीने पोलिसांची शान वाढवली.
याबद्दल मुस्लिम समाजानेही पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कर्तव्याला चांगली दाद दिली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याने चोख कामगिरी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यात भर दिवसा अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना शाहूपुरी मध्ये घडली होती. याबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केल्यानंतर सात दिवसातच खऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून कारवाई करण्यात आली. त्यामुळेच शाहूपुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री म्हेत्रे यांचा जमियत उलमा ए हिंद सातारा , मुस्लिम मावळा , खिदमत ए खलक आणि मुस्लिम राहत संस्थेमार्फत जमियत उलमा ए हिंदचे जिल्हा सेक्रेटरी मुफ्ती उबेदुल्लाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका युवकाने शाळकरी मुलीचे शोषण करण्याच्या हेतूने अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदरील मुलाच्या हल्ल्यामुळे अल्पवयीन शाळकरी मुलगी बेशुद्ध झाली. तिला मृत समजून त्या युवकाने अपार्टमेंटच्या पार्किंग मधील अडगळीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलीला फेकून दिले होते.तिच्या अंगावर प्लायवूड टाकून गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. अश्या वेळेस मुलीचे नशीब बलवत्तर म्हणून ती शुद्धीवर आली आणि तिने आरडाओरड केला. त्यामुळे सदरील अपार्टमेंट मधील नागरिकांनी मुलीला बाहेर काढले. तसेच नातेवाईकांच्या साहाय्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले .
शाहूपुरी पोलीस प्रशासनाने वेगवेगळे पथक तयार करत योग्य तपास यंत्रणा राबविली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या सातच दिवसात मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीने डिस्चार्ज घेतल्यानंतर चार संशयितांपैकी आरोपीला ओळखून पोलिसांना त्यांच्या कर्तव्याला मोलाची साथ दिली .
शाहूपुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री म्हेत्रे , बाबर मॅडम व कर्मचाऱ्यांनी पीडितेला न्याय देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
साताऱ्यातील सामाजिक संस्था व जमियत उलमा हिंदचे मुफ्ती उबेदुल्लाह , मुफ्ती मोहसीन ,मौलाना अब्दुल अलीम , मुस्लिम मावळाचे अझहर मणेर, हाजी नदाफ ,मोहसीन कोरबू , सारीम शेख खिदमत ए खालक चे अरिफ खान , जमीर शेख ,अझहर शेख ,मुस्लिम राहतचे सादिक अली बागवान , अझहर शेख व इतर कार्यकर्त्यांनी सत्कार केल्याबद्दल क्षमपुर्वी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी भारावून गेले होते.




