कराड:-श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहाने संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहाने संपन्न.
कराड:- श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहाने संपन्न केला. विद्यार्थी मुख्याध्यापक चि. आर्यन कोंडुभैरी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी दहावीचे वर्गशिक्षक सौ. एस. आर. पवार ,श्री.ए.डी. झांबरे तसेच मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने एक दिवस यशस्वी शाळा सांभाळली. विद्यार्थी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी शिक्षक श्री. एन. आर. पवार सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील आदर्श कार्य, त्यांची विचार प्रणाली विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षकांची कर्तव्ये व भविष्यात उत्तम व्यक्ती बनण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ईशस्तवन, स्वागत ,भित्तिपत्रक प्रकाशन, विद्यार्थी शिक्षकांची मनोगते झाली.विद्यार्थी शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले.आभार श्री.ए.बी.रोडे सर यांनी मानले.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री टी डी जाधव शिक्षक शिक्षिका विद्यार्थी शिक्षके उत्तर कर्मचारी उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन