भुसावळ:-जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व.
(बियाणी स्कूलचे मुला- मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर.)
भुसावळ – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी जळगाव व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ सप्टेंबर २५ रोजी बियाणी मिल्ट्री स्कूल, भुसावळ येथे जिल्हास्तरीय १७ वर्षातील मुला मुलींच्या हॉकी शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजयी व उप विजयी संघास बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पदा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वय डॉ. प्रदीप साखरे, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू व जामनेर तालुका क्रीडा समन्वयक डॉ.आसिफ खान, दिलीप संगेल , यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.या स्पर्धांमध्ये १७ वर्ष मुले व मुली यांचे एकूण १० संघ सहभागी झाले होते
*१७ वर्षाखालील मुले* 17 वर्षीय मुलं व मुली शालेय हॉकीस्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे -अंतिम मुलांचा सामना बियाणी मिलिटरी स्कूल व एमआय तेली इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात बियाणी मिलिटरी स्कूल ने २-१असा विजय संपादन केले , तृतीय सामना अलहिरा उर्दू स्कूल भुसावळ व ताप्ती स्कूल भुसावळ यांच्यात झाला. या सामन्यात अलहिरा या स्कूलने ३_२ असा विजय संपादन केला.
मुलींचा अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूल व डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ यांच्यात झाला. या सामन्यात बियाणी पब्लिक स्कूलने १_० असा विजय संपादन केला. तृतीय सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट मेरी स्कूल अमळनेर यांच्यात झाला. त्यात ताप्ती स्कूलने ३_१ असा विजय संपादन केला बियाणी , भुसावळ विजयी बी झेड उर्दू हायस्कूल भुसावळ, उपविजेता. *हॉकी शालेय १७ वर्ष मुले*
बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ ने प्रथम क्रमांक पटकावला.
तर एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ द्वितीय स्थानिक राहीला.व अलहिरा उर्दू हायस्कूल भुसावळ ला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
*हॉकी शालेय १७ वर्ष मुली*
बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ प्रथम तर डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, द्वितीय स्थानी राहिली.व ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ. ला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
विजयी व उप विजयी संघातील खेळाडूंना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे पदक देऊन गौरविण्यात आले.
पंच म्हणून अमन तेली व तौसिफ बेग, अमीर शेख, प्रणव बारेला यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक एच.एन. पाटील., व युसुफ खान व बियाणी मिलिटरी स्कूलच्या सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन