वाई:-यश अपयशापेक्षा खिलाडूवृत्तीने खेळत रहा.. श्री.युवराज थोरात
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
यश अपयशापेक्षा खिलाडूवृत्तीने खेळत रहा.. श्री.युवराज थोरात
वाई दि :६ तालुकास्तरापासून शालेय जीवनातील स्पर्धांमध्ये भाग घेणे व जिंकणे ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे.अशाच स्पर्धा सतत जिंकत गेल्यानंतर तुम्ही ऑलम्पिक स्पर्धेलाही गवसणी घालू शकता असे उद् घार गरवारे टेक्निकल फायबर वाईचे जनरल मॅनेजर (H.R.) श्री युवराज थोरात यांनी काढले.
ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाई येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्या विद्यमाने वाई तालुकास्तरीय शासकीय शालेय योगा स्पर्धा २०२५-२६ शुभारंभ प्रसंगी थोरात बोलत होते.यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप चव्हाण,विश्वस्त प्रा दत्तात्रय वाघचवरे,दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार, सुनिल पानसे आदि मान्यवर उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, शालेय जीवनात तुम्हाला खेळाची आवड व शिस्त लागु शकते.शारिरीक तंदुरुस्ती उत्तम राहते.ज्ञानदीप परिवार व गरवारे उद्योग समुहाचे जुने नाते आहे ते वृद्धिंगत करणेचा मी प्रयत्न करेन.
प्रा.वाघचवरे सर आपल्या मनोगतात म्हणाले..
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुका ते राज्यस्तरीय अनेक खेळांच्या स्पर्धा ज्ञानदीप स्कूलमध्ये होत असतात कारण आम्ही नेहमी नियोजनबद्ध व निपक्षीतेपणे स्पर्धेच्या आयोजन करत असतो त्यामुळे विविध क्रीडा प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन ज्ञानदीप स्कूलकडे सोपवले जाते याचा आम्हाला अभिमान आहे. या कामी प्राचार्या शुभांगी पवार व क्रीडा विभाग प्रमुख सचिन लेंभे यांचेही उत्तम नियोजन असते.
विद्यावर्धिनी संस्थेचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता मर्ढेकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञानदीप स्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
वाई तालुक्यात विजेतेपद मिळवित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र खेळाडू..
14 -वर्षाखालील मुले- मुली -प्रसन्न कुंभार,हर्षद भोसले, देवान शिंदे, आदित्य शिंदे, हर्षवर्धन जाधव, सस्मित पवार, श्रीराज डेरे, मुली- मधुरा सपकाळ, रिया जमदाडे, अदिती चिकणे, वेदिका गाढवे,प्राची जाधव, आरती मांढरे,ईश्वरीशेलार
17 वर्षाखालील मुले- मुली
विराज भोसले, सार्थक गाढवे, आर्यन अडसूळ, यशराज पिसाळ, सात्विक मोरे,आर्यन चव्हाण, रोशन वाशिवले, मुली अद्वेता जाधव, वैभवी गाढवे, श्रेया जाधव, वैभवी काळे, नीलम जाधव,गायत्री गलांडे, सौख्यदा लेंभे.
19 वर्षाखालील मुले-मुली
प्रणय गाढवे,रसिक कांबळे, समसिल मोमीन,राजवर्धन मांढरे, ओम धुमाळ, स्वानंद सुतार, आर्यन ननावरे, मुली -वैष्णवी घाडगे, संजना मरबे, मनस्वी जाधव,वैष्णवी पिसाळ,अनुष्का जगताप, आरती मांढरे, समृद्धी अहिरे, तृप्ती कणसे यांनी यश मिळविले.
प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख सचिन लेंभे यांनी व आभार शिवाजी निकम यांनी मानले.स्पर्धेत पंच म्हणून व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रसाद गोळे,अमर कवे,सचिन तिमुनकर, श्री सागर किर्दत,अस्मिता गोळे, प्रणाली जगताप, श्रद्धा खरात, श्रेया सपकाळ,श्रावणी उंबरकर, शिवराज वरे, विक्रांत पोळ, वजीर शेख यांनी काम पाहिले.
फोटो खालील ओळी : उद्घाटनप्रसंगी श्रीफळ वाढविताना युवराज थोरात शेजारी दिलीप चव्हाण,प्रा.दत्तात्रय वाघचवरे, दत्ता मर्ढेकर, सुनिल पानसे, शुभांगी पवार, सचिन लेंभे मान्यवर उपस्थित होते.