कडेगाव:-(वाई)-शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – श्री धुमाळ.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – श्री धुमाळ.
सध्या बाजार भावातील चढ उतार पाहता जास्तीत जास्त आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन श्री हरिश्चंद्र धुमाळ तालुका कृषि अधिकारी वाई यांनी केले. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया सोयाबीन अंतर्गत दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणा वेळी कडेगांव येथे ते बोलत होते.
तसेच विविध प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्यागांमध्ये सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे श्री धुमाळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना श्री धुमाळ यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने महा कृषि विस्तार AI अँप चा वापर करावा व आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे असे ही आवाहन केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ श्री संग्राम पाटील यांनी सोयाबीन पिकाची सध्याची परिस्थिती यावर शेतकऱ्यांशी चर्चा केली तसेच सोयाबीन पिकावरील किड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
श्री कल्याण बाबर यांनी सोयाबीन पिकावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या तयार होणाऱ्या विविध पदार्थ विषयी मार्गदर्शन केले. तसेच आहाराबद्दल जागृत राहण्याचे आवाहन सुद्धा शेतकऱ्यांना केले.
श्री रवींद्र बेलदार मंडळ कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, श्री निखिल मोरे उप कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री किरण बाबर उप कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी कार्यालय वाई अधिनस्त सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, कार्यक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.