विवेक जागर संस्था – अंनिसा महाराष्ट्र यांच्या विद्यमाने “वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा उच्चाटण” कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर खारघर येथे संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
विवेक जागर संस्था – अंनिसा महाराष्ट्र यांच्या विद्यमाने “वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा उच्चाटण” कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर खारघर येथे संपन्न.
खारघर नवी मुंबई – विवेक जागर संस्था अंनिसा महाराष्ट्र यांच्या विद्यमाने डॉ नरेंद्र दाभोळकर विज्ञान केंद्र खारघर येथे मा अरविंद सोनटक्के साहेब IRS यांच्या अध्यक्षतेखाली” बेलापूर सीबीडी नवी मुंबई येथील कोर्टा मध्ये मिळालेल्या लिंबू मिरची प्रकरणावर लक्ष केंद्रित करत ” वैज्ञानिक दृष्टिकोन- अंधश्रद्धा उच्चाटन प्रचार- प्रसार” करण्यासाठी एक दिवसीय लक्षणीय कार्यशाळा -प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
यावेळी भारत सरकारच्या विश्व मानवअधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगाच्या सदस्य पदी मा मधुकर आढाव साहेब यांची निवड झाल्याबद्दल सत्कार, अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमात प्रथम स्वागत समारंभ प्रधान दिनेश शिंदे यांनी केले त्यानंतर महा अंनिसा पंचसुत्री कार्यक्रमाचे विश्लेषण माननीय अशोक निकम यांनी केले तसेच महा अंनिसा भूमिका आणि अंध श्रद्धेतून होणारे शोषण आणि त्यापासून मुक्ती व आधुनिक विचारांची प्रेरणा याचे विश्लेषण प्राध्यापक अशोक कुमार वाघमारे यांनी केले तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याचे महत्त्व आजच्या युगात अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची आजच्या काळात यावरती संवाद राजेंद्र पंडित यांनी केला चमत्कार वैज्ञानिक दृष्टिकोन हात चला तिचे प्रात्यक्षिक नितीन खेडेकर यांनी करून दाखवले याप्रसंगी सर्व प्रशिक्षक अंनिसाचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांचे आभार व सूत्रसंचालन खारघर शाखा कार्याध्यक्ष मा जितेंद्र बनसोडे यांनी केले.