वाई:-जिव्हाळा ग्रुपच्या प्रदर्शनाचा मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते समारोप – महिला उत्पादनाची मोठी उलाढाल.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई जिव्हाळा ग्रुपच्या प्रदर्शनाचा
मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते समारोप. महिला उत्पादनाची मोठी उलाढाल.
वाई दि ५ :- येथील जिव्हाळा ग्रुपने
रक्षाबंधन, गौरी – गणपती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महिलांच्या उत्पादन प्रदर्शनचा समारोप राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते झाला. यामध्ये विविध सौंदर्य प्रसाधने , ज्वेलरी, लाकडी खेळणी, राख्या, रांगोळी, ड्रेस मटेरियल, उदबत्ती, खाद्यपदार्थ असाप्रकारचे एकूण
या उपक्रमात ७० स्टॉलधारक होते. यावेळी लाखो रुपयांची उलाढाल झाली.
प्रारंभी श्री. पाटील यांच्या हस्ते जिव्हेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी श्री. पाटील म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम पहात आहेत. ५१ टक्के आरक्षणामुळे राजकारणात आणि सत्ताकारणात महिला आघाडीवर आहेत. बचत गट व विविध व्यवसायांच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या रहात आहेत. त्यांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिव्हाळा ग्रुपने राबविलेला प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे महिला उद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती लक्ष्मी कळंबे, शहर अध्यक्षा सौ निशा डाळवाले, प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, भद्रेश भाटे, विश्वास पवार, सारिका गवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनाचे उदघाटन मिसेस युनिव्हर्सल विश्वसुंदरी नूतन मिस्त्री ,नाशिक यांचे हस्ते व उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रोहित मिस्त्री मुंबई डॉ. गीता फणसळकर, डॉ नीलम भोसले, कोमल पारेख,सौ अंजली मदन पोरे,सौ प्राजक्ता नितीन पोरे यांच्या उपस्थितीत झाले.
जिव्हाळा ग्रुपच्या सदस्या सौ इर्षा तांबे-हावरे,सौ. सोनाली दाहोत्रे, सौ सुजाता कोदे, सौ साधना पारखे यांनी स्वागत केले व आभार मानले. अध्यक्षा सौ सोनाली तुषार कोदे यांनी प्रास्ताविकात उपक्रमांची माहिती दिली. त्यांनतर मंत्री श्री.पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन महिलांच्या उत्पादनाची माहिती घेतली, कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
प्रदर्शन यशस्वी करणेसाठी योगेश दाहोत्रे, तुषार कोदे,सौरभ बिचकर,आनंदा सुकाळे,शेखर दाहोत्रे आदी स्वकुळ साळी समाजातील महिला पुरुष यांनी विशेष परिश्रम घेतले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
—–
फोटो खालील ओळी:-
वाई:- जिव्हाळा ग्रुपच्या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलताना ना.मकरंद पाटील, त्यावेळी दत्ता मर्ढेकर, विश्वास पवार, भद्रेश भाटे, श्रीमती लक्ष्मी कळंबे, सौ.निशा डाळवाले व सौ सोनाली कोदे )