श्रीरामपूर:-(माळेवाडी)-मागील वर्षाप्रमाणे भंडारदरा सिंचन प्रणालीच्या ओव्हर फ्लोचे योग्य नियोजन करा.—अनिलराव औताडे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर:-(माळेवाडी)-मागील वर्षाप्रमाणे भंडारदरा सिंचन प्रणालीच्या ओव्हर फ्लोचे योग्य नियोजन करा.—अनिलराव औताडे.
माळेवाडी
भंडारदरा सिंचन प्रणालीच्या जलसंपदा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मागील वर्षी शेतकरी संघटनेच्या व शेतकऱ्यांच्या सूचनेप्रमाणे योग्य नियोजन केल्यामुळे योग्य नियोजन केल्यामुळे कार्यक्षेत्रात पाण्याची परिस्थिती चांगली राहिली होती. त्याचप्रमाणे याही वर्षी योग्य नियोजन केल्यास पाट पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण राहील. तरी जलसंपदा विभागाने टेल पर्यंत ओव्हरफ्लोचे पाणी पोहोचवून टाकळीभान टेल टॅंक, मुठेवाडगाव पाझर तलाव सह कार्यक्षेत्रातील सर्व गावतळी, शेततळी, बीसी नाला, ए. सी.नाल्यावरील शिरपूर पॅटर्न भरून देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
मागील वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे किमान चार टीएमसी पाणी शिल्लक राहिली होते. आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षाच्या योग्य नियोजनामुळे आपल्याला जुलै महिन्यामध्ये खरीप पिकांना पाणी देण्यासाठी खरिपाचे आवर्तन घेण्याची संधी मिळाली. आज रोजी कार्यक्षेत्रात पर्जन्यमान खूप कमी असल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. जायकवाडीचा नाथसागर 80 टक्के भरला असून धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तुटीच्या खोऱ्याच्या कुठलाही निकशाचे बंधन नसताना तात्काळ ओव्हरफ्लो सोडण्यात यावा. जलसंपदा विभागाने प्रवरा नदीत चार ते पाच हजार क्युसेकने पाणी सोडले असून ओझर मधून कॅनॉलला 250 क्युसेकच विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे ओव्हर फ्लो चे पाणी देण्यास जलसंपदा विभागाला काय अडचण आहे असाही प्रश्न निर्माण होत आहे. वास्तविक जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांचे टेल पर्यंत पाणी पोहोचविण्याची सक्त आदेश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून मंत्री महोदयाच्या आदेशाचे का पालन होत नाही. मागील वर्षी भंडारदारा सिंचन प्रणालीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी कालवा निरीक्षकांना सप्त सूचना देऊन प्रत्येक चारीवरील गाव तळ्यांना ,शिरपूर पॅटर्न व शेततळ्यांना कुठलीही बेकायदेशीर आकारणी न करता पाणी देण्याचे आदेश दिले होते. तसेच आदेश कालवा निरीक्षकांना देऊन कार्यक्षेत्रातील सर्व प्रकल्पांना पाणी देण्याच्या सूचना कराव्या असे आव्हानही जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे. पत्रकावर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे, डॉक्टर रोहित कुलकर्णी, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सुदामराव औताडे, डॉ. विकास नवले, सागर गिऱ्हे, शिवाजीराव पटारे, शरद पवार, संतोष पटारे, दिलीप ता.औताडे, सुजित बोडखे,संजय वमने, दिलीप ल . औताडे, सतीश नाईक, समीर रोकडे, शरद असणे, बाबासाहेब वेताळ, बाळासाहेब असणे, शैलेश वमने, कडू पवार, नारायण पवार, इंद्रभान चोरमल, अहमदभाई जहागीरदार, आदी अहिल्या नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केल्या आहे.