जि.प. केंद्र शाळा पाडळीला दिनकर शेलार यांच्याकडून देणगी.
प्रतिनिधि :- महेश मोहिते सातारा

*जि.प. केंद्र केंद्र शाळा पाडळीला दिनकर शेलार यांच्या कडु देणगी*
पाडळी ता.जि.सातारा गावचे सुपुत्र तसेच नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून परदेशात नर्सिंग क्षेत्रात आपल्या पाडळी गावचे नाव मोठे केलेले आणि *जि.प.केंद्रशाळा,पाडळीचे माजी विद्यार्थी* *तथा थोर देणगीदार* *श्री अरुण दिनकर शेलार* यांनी
कै दिनकर श्रीपती शेलार(मा. उपसरपंच)आणि कै बबई दिनकर शेलार यांचे स्मरणार्थ निरंतर ठेव योजनेसाठी *10,000/-(दहा हजार रूपये)* आणि शालेय भौतिक सुविधा साठी *20,000/-(वीस हजार रूपये)* असे आपले शाळेसाठी एकूण *तीस हजार रूपये* देणगी देऊन शाळेच्या ऋणातुन उतराई होऊन इतरांपुढे आदर्श ठेवला.
यावेळी त्यांच्या सौभाग्यवती सौ.सुरेखा अरूण शेलार,मा.केंद्रप्रमुख श्री.सातपुते साहेब,माजी केंद्रप्रमुख श्री.गायकवाड साहेब , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संतोष अडसूळ,सदस्य श्री.अशोक ढाणे,श्री.सागर ढाणे,सौ.सोनाली ढाणे तसेच मुख्याध्यापिका श्रीमती सारिका रोकडे मॅडम व सर्व शिक्षक वृंद शाळा पाडळी आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.