वाई:-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वाई शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मंगळवार दिनांक 22 जुलै 2025
वाई:-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वाई शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाई शहर भाजप च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केलेले होते.
भाजप च्या सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या देशकार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
याप्रसंगी वाई शहर अध्यक्ष विजय ढेकाणे यांनी स्वतः रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. तसेच याप्रसंगी वाई तालुका अध्यक्ष दिपक ननावरे, वाई तालुका पश्चिम चे अध्यक्ष गणेश सुतार यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच रक्तदान कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी स्वतः भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आदरणीय मदन दादा भोसले यांनीही उपस्थित राहून सर्व रक्तदात्यांचे आभार मानले, त्यांना प्रशस्तिपत्र व गणेश मूर्ती देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमास भाजप चे अविनाश जी फरांदे, काशिनाथ जी शेलार, यशवंत जी लेले, रोहिदास बापू पिसाळ, तेजस दादा जमदाडे, सुरज जमदाडे, सचिन घाटगे, दत्ता ढेकाणे, नाना कायंगूडे, तुषार चक्के,गणेश जयगुडे व भाजप च्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जवळ जवळ 115 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बेल एअर हॉस्पिटल चे सर्वे सर्वा फादर टॉमी यांनीही रक्तदान शिबिरास भेट दिली. बेल एअर ब्लड बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल गणेश मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.