श्रीरामपूर:-अशोकच्या हितरक्षणार्थ किमान गणेश इतके तरी पैसे ऊस उत्पादकांना द्या ! – जिल्हाध्यक्ष औताडे यांचा निर्वाणीचा इशारा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
अशोकच्या हितरक्षणार्थ किमान गणेश इतके तरी पैसे ऊस उत्पादकांना द्या ! – जिल्हाध्यक्ष औताडे यांचा निर्वाणीचा इशारा.
श्रीरामपुर
अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे हितरक्षण करण्यासाठी व तालुक्याचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी कारखाना व्यवस्थापकाने गाळप हंगाम २०२५ – २६ साठी ३५०० / – रु प्रति टन दर देणे आवश्यक असून मागील दोन हंगामाचे प्रतिटन ८०० / – रुपये प्रति टनाने शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी संघटना सभासद कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात यावी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे . तालुका अध्यक्ष युवाराज जगताप . सुदामराव औताडे . साहेबराव चोरमल . डॉ दादासाहेब आदिक . डॉ . विकास नवले . सुजित बोडके . शिवाजी पटारे . संजय काळे . बबनराव उघडे .इंद्रभान चोरमल . संदीप अभंग . भागचंद औताडे ‘ कडू पवार . अकबर शेख आदि ऊस उत्पादकांनी निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने यांचे सह कार्यकारी संचालक संतोष देवकर यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले . दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘ मागील दोन गाळप हंगामात इतर कारखान्यांसह गणेशच्या तुलनेत ८०० / – रुपये प्रति टन जास्त देणे व्यवहार्य होते . परंतु आपणाकडून २७०० रुपये प्रति टन दर देऊन व जिल्हा बँकेची सक्तीची वसुली करून ऊस उत्पादकांची दिशाभूल करून मोठे नुकसान केले आहे . अशा परिस्थिती मध्ये आपणाकडून कारखाना कर्मचाऱ्यांचे ही पगार सात सात महिने उशिराने होत आहे . या सर्व चुकीच्या बाबींमुळे ऊस उत्पादक सभासद व कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे . सुरू होणाऱ्या गाळप हंगाम २०२५ -२६ मध्ये अशोकच्या शेजारील राहुरी गणेश सह वैजापुर तालुक्यातील पंचगंगा हा खाजगी नव्याने करखाना सुरू होत आहे . पंचगंगा शुगर अशोकच्या कार्यक्षेत्रात 30 ५० / – रुपये प्रति टनाने नोंदी घेत आहे आज रोजी अशोकच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांची कमी दर घेण्याची इच्छा नसून सदर बाब ही आपल्या कारखान्यास हानी पोहोचविणारी ठरणार आहे . त्यामुळे आपणास ऊस उत्पादक सभासदाची विश्वसर्हता मिळविण्यास मागील दोन हंगामासाठी ३५०० / – रुपये प्रति टन दर बॉयलर पेटविण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत घोषित करणे कारखान्याच्या हितरक्षणासाठी गरजेचे आहे . अन्यथा आपल्या अशोकच्या कार्यक्षेत्रात १० लाख मॅट्रिक टन ऊस उपलब्ध असूनही ऊस उत्पादक आपल्या चुकीच्या आर्थिक कारभारामुळे जास्तीचा दर देणाऱ्या कारखान्याला ऊस देतील त्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असून देखील डॉक्टर तनपुरे कारखान्यासारखी परिस्थिती आपल्याच मुळे निर्माण होणार आहे या सर्व दुष्परिणामांची जबाबदारी अशोक कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांचे वरच राहील सदर लेखी दिलेल्या निवेदनाचा उद्देश आज रोजी कुठतीही राजकीय भूमिका नसून अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनु असून ती वाचली पाहिजे हाच असून ती वाचली पाहिजे हाच असून याबाबतचे आत्मपरीक्षणही आपण करावे ‘ तरी आपणास अशोक कारखान्याच्या हितरक्षणासाठी विनंतीपूर्वक निवेदन देण्यात येत आहे . सदर निवेदनाचा आदरपूर्वक सन्मान करून व्यवस्थापनाने ऊस उत्पादक व कामगारांना न्याय देऊन अशोक कारखाना वाचविण्यासाठी दायित्व दाखवावे असे म्हटले आहे.