वाई:-(आसले)-जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा श्री बेलदार-आसले गावात अभिनव उपक्रम.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा श्री बेलदार-आसले गावात अभिनव उपक्रम.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ऊस क्षेत्राच्या बांधावर फळबाग लागवड करण्यासाठी शासनाकडून वाई तालुक्यांमध्ये दोन गावांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये असले या गावाची निवड करण्यात आलेली आहे. तरी या योजनेअंतर्गत शंभर शेतकऱ्यांची निवड करून त्यांना बांधावर फळबाग लागवड या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व ग्रामपंचायत तसेच सर्व शेतकरी यांच्या सहकार्याने हि योजना यशस्वी करण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी श्री रवींद्र बेलदार यांनी आसले येथे केले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री बेलदार यांनी बांधावर फळबाग लागवड योजनेविषयी माहिती दिली. तसेच उप कृषि अधिकारी श्री निखिल मोरे यांनी लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, मिळणारे अनुदान, शासकीय व शासनमान्य फळरोप वाटिका यांची माहिती अशी सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती ललिता बोडके यांच्याकडे सादर करावी असे सांगितले.
सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती ललिता बोडके यांनी कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी श्री भुसारे श्री नाळे श्री वंजारी , सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन तसेच आसले गावातील शेतकरी उपस्थित होते.