वाई:- जनता शिक्षण संस्थेचा ५८ वा वर्धापन दिन व गुणगौरव समारंभ.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई: दि.१०
जनता शिक्षण संस्थेचा ५८ वा वर्धापन दिन व गुणगौरव समारंभ.

शिक्षण आणि समाजकार्यात अग्रगण्य असलेल्या जनता शिक्षण संस्थेचा ५८ वा ‘वर्धापन दिन’ आणि ‘विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ’ शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता वाई येथील किसन वीर महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समारंभाचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध वक्ते आणि लेखक डॉ. उदय निरगुडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापक, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, संस्थेच्या सर्व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित राहाणार आहेत.
या ‘वर्धापनदिना’निमित्त जनता शिक्षण संस्था संचलित किसन वीर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विशेष गौरव’ करण्यात येणार आहे.या प्रेरणादायी सोहळ्यास वाई आणि वाई परिसरातील पालक,विद्यार्थी, माजी विद्यार्थी,आणि नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन
संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी यांनी केले आहे.




