सुरवडी:-(फलटण)-युवानेते विशाल माडकरांच्या घरी महादेव जानकर यांची सदिच्छा भेट व चर्चा.
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
युवानेते विशाल माडकरांच्या घरी महादेव जानकर यांची सदिच्छा भेट व चर्चा.
सुरवडी (फलटण):- महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकतीच सुरवडी गावचे सुपुत्र व राष्ट्रीय समाज पक्षाचे कट्टर समर्थक युवानेते विशाल बापू माडकर यांच्या सुरवडी ता फलटण जि सातारा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नेते महादेव जानकर यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन विशाल माडकर यांनी केले.
आभारप्रदर्शन ज्ञानदेव साळवे यांनी केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते होते या बैठकीसाठी सुरवडी गावचे उद्योजक ज्ञानदेव साळवे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुषार जगताप,युवा आघाडीचे नेते निलेश लांडगे, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख रमेश चव्हाण,सोशल मीडिया प्रमुख विक्रम माने, युवा उद्योजक ऋषिकेश बिचकुले, साखरवाडी भागातील रासपचे युवा नेते मयूर धोत्रे, निखिल कुचेकर व मराठा धनगर माळी मागासवर्गीय बहुजन समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सुरवडी गावचे सुपुत्र व राष्ट्रीय समाज पक्षाचे कट्टर समर्थक युवानेते विशाल बापू माडकर यांच्या घरी महादेव जानकर यांनी भुईमुगाच्या शेंगा, चहापाणी व अल्पोपहार याचा आस्वाद घेत युवा नेते विशाल माडकरांच्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्य यांच्याशीही संवाद साधला.